Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुर्कीचा मोठा निर्णय! LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला बंदरावर प्रवेश नकारला; कारण काय ?

तुर्कीचा मोठा निर्णय! LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला बंदरावर प्रवेश नकारला; कारण काय ?

  • LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला तुर्की बंदरावर प्रवेश नकारला
  • कारण काय?
  • जाणून घ्या
Turkey Denies LGBTQ+ Cruise Ship Entry : LGBTQ+ समुदायाबाबतच्या धोरणांवरुन चर्चेत राहिलेला तुर्कीने पुन्हा एकदा खळबळजनक निर्णय घेतला आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. तुर्कीने LGBTQ+ समुदायाच्या पर्यटकांसाठीच्या एका अलिशान क्रूझ जहाजाला आपल्या दोन प्रमुख बंदरावर थांबवण्यास नकार दिला आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी नैतिक मूल्यांचा हवाला देत हा निर्ण. घेतला आहे. या निर्णयानंतर क्रूझला संपूर्ण प्रवासाचा मार्ग बदलावा लागला आहे. आता हे जहाज इजिप्तच्या दिशेने रवाना झाले आहे.

France-Spain Wildfire : स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर; उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट, मृतांच्या आकड्यात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, अटलांटिस इव्हेंट्स या अमेरिकास्थित ट्रॅव्हल कंपनीने स्कार्लेट लेडी जहाजांवर १० दिवसांची अथेन्स ते व्हेनिस सफर चे आयोजन केले होते. ०५ जुलै पासून १० दिवसांची टूर आयोजित करण्यात आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाज तुर्कीमधील कुसादासी रिसॉर्ट शहरात आणि इस्तंबूलच्या बंदरावर थांबणार होते.

मात्र, तुर्की सरकारने दोन्ही बंदरावर थांबवण्यास जहाजाला नकार दिला. तुर्की सरकारने हा निर्णय देशाच्या सामाजिक रचनेशी आणि नैतिक मूल्यांशि विसंगत असल्याचे सांगितले. सध्या आयोजकांनी जहाजाचा मार्ग बदलला आहे. तुर्कीऐवजी हे जहाज आता इजिप्तची राजधानी कैरो आणि ग्रीसमधील क्रेट बेटावर थांबणार आहे. या टूरमध्ये सुमारे १,९०० LGBTQ+ प्रवासी सहभागी होणार असून सर्वात जास्त अमेरिकेतील लोकांचा सहभाग आहे.

कंपनीकडून नाराजी व्यक्त

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तुर्कीच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. केवळ LGBTQ+ प्रवाशांमुळे एखाद्या देशाने प्रवेश नाकारण्याची ही पहिलीच घटना असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. कंपनीने स्पष्ट केले की, ही टूर कोणत्याही राजकीय हेतून काढण्यात आलेली नाही. याचा उद्देश केवळ पर्यटन आणि संस्कृतीचा आदर करणेच आहे.

तुर्कीची प्रतिक्रिया

तुर्की सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित गटाचे वर्तन देशाच्या सामाजिक रचनेशी आणि नैतिक मुल्यांच्या विरोधात आहे. यामुळे जहाजाला कुशादासी बंदरावर थांबण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात तुर्कीने LGBTQ+ समुदायाशी संबंधित अनेक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहे. प्राइड मार्चवरही बंदी घातली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीवर टीका केली जात आहे. LGBTQ+ समुदायाच्या क्रूझला प्रवेस नाकारल्यानेही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Trump on Khamenei Funeral : ' आम्ही आठवड्याभराची मुभा दिली' ; खामेनेईंच्या अंत्यसंस्कारावरुन ट्रम्प यांनी उडवली इराणची खिल्ली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra