Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

उंब्रजमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना व वीज ग्राहक आक्रमक; बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढा; अन्यथा १५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन

उंब्रज : उंब्रज परिसरात स्मार्ट मीटरविरोधातील जनक्षोभ दिवसेंदिवस तीव्र होत असून, वाढीव वीज बिलांमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी उंब्रज येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला.

स्मार्ट मीटर हटाव, ग्राहकांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने वीज ग्राहक महावितरण कार्यालयात दाखल झाले.यावेळी कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले, उपतालुकाप्रमुख जीवन गायकवाड, संदीप थोरात, संदीप सपकाळ, रामराव घाडगे, योगेश गुजले, शंकरराव घार्गे, शशिकांत पवार, पांडुरंग सावंत, लक्ष्मण गोंजारे, श्रीमंत चव्हाण, लक्ष्मण नाईक, प्रभाकर कमाने, अविराज देशमुख, राजेश शिंदे, महादेव भोंगाळे, सचिन कांबळे, विक्रम अर्जूकडे यांच्यासह शिवसैनिक व मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.

Satara Water Crisis: साताऱ्यात पाण्याच्या थेंबासाठी रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने नागरिक आक्रमक

उंब्रज महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अनंत लाड यांना निवेदन देऊन बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढून पूर्वीचे डिजिटल मीटर बसविण्याची मागणी करण्यात आली.१५ ऑगस्टपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला.

निवेदनात म्हटले आहे की, उंब्रज महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले पूर्वीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट वाढली आहेत. तसेच वाढीव बिलामुळे ग्राहकांनी भरलेली अतिरिक्त रक्कम नियमानुसार परत करावी आणि स्मार्ट मीटर हटवून पुन्हा डिजिटल मीटर बसविण्याचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली. शिवसैनिकांनी स्मार्ट मीटर धोरणाचा निषेध करत अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले. तसेच उंब्रज परिसरात नव्याने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्या ठिकाणी पूर्वीचे डिजिटल मीटर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.

Satara Politics: जिल्हा बँक निवडणुकीत शेवटच्या ठरावाकडे लक्ष; हातगेघर सोसायटी ठरणार निर्णायक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra