Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत. ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत. ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

  • ऑगस्टमध्ये गूगल, रेडमी, विवो, पोको आणि आयक्यू चे अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.
  • फ्लॅगशिपसह बजेट आणि कॅमेरा-केंद्रित स्मार्टफोन्स ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
  • 8,000mAh पर्यंत बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेऱ्यांसारखे दमदार फीचर्स मिळणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात टेक कंपन्या अनेक नवीन आणि पावरफुल स्मार्टफोनलाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गूगस, रेडमी, सॅमसंग आणि विवोसह अनेक टेक कंपन्या ऑगस्ट महिन्यात त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या महिन्यात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. ऑगस्ट महिन्यात टेक कंपन्या कोणते नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

भारतात OnePlus चा पुन्हा धमाका! नवा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्सने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

गूगल पिक्सेल 11 सीरीज

ऑगस्ट महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या गूगल लाँच ईव्हेंटमध्ये गूगल पिक्सेल 11 सिरीज लाँच केली जाणार आहे. हा ईव्हेंट 12 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससोबतच स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोन सिरीजमध्ये स्टँडर्ड मॉडेलसह प्रो आणि प्रो प्लस मॉडेल देखील लाँच केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)

विवो व्हि 80 सीरीज

हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असून ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनी V80, V80 Elite, आणि V80 FE हे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. आगामी विवो व्हि 80 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फ्लॅट अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असू शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट, 7,200mAh सिलिकन कार्बन बॅटरी दिली जाणार आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 8MP चा अल्ट्रावाइड सेंसर दिला जाणार आहे.

रेडमी नोट 17 सीरीज

रेडमी स्मार्टफोन सिरीज देखील ऑगस्ट महिन्यात लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी स्टँडर्ड, प्रो आणि प्रो प्लस असे तीन मॉडेल्स लाँच करणार आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्ये 6.99-इंच अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स मिळणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो. फोनमध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

विवो एस 2

विवो एस 2 स्मार्टफोन देखील भारतात लवकरच लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. प्रिमियम डिझाईन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच कर्व अमोलेड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, सोनी 50 मेगापिक्सेल आयएमएक्स 852 प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 44W चार्जिंग सपोर्टसह 7,050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

पोको एम 8 पॉवर

पोको स्मार्टफोन देखील भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट 17 स्मार्टफोनचे रिब्रँड वर्जन आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh सिलिकन कार्बन बॅटरी, 45W चार्जिंग सपोर्ट, 7-इंच ओएलईडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आयक्यू झेड 11

नवीन आयक्यू स्मार्टफोन देखील भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 9,020mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra