Dailyhunt
US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

  • इराणची नवी खेळी
  • ओमानच्या मदतीने अमेरिकेची नाकेबंदी तोडणार?
  • जाणून घ्या काय आहे मास्टरप्लॅन?
Strait of Hormuz Crisis : पश्चिम आशियातील अमेरिका इराण तणाव आता एका निर्णयाक वळणावर येऊन पोहोचला आहे.
एका ताज्या अहवालानुसार इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनी खुली करण्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेसोमर झुकण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे. इराणने आपली भूमिका अधिक आक्रमक केली असून अणु कार्यक्रमावर तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच होर्मुझमध्ये अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी मोठा पाऊल उचलले आहे.

Global Politics : पाकिस्तानचा 'डबल गेम'! इराणसाठी गुपचूप खुल केले 'हे' महत्त्वपूर्ण ६ मार्ग, अमेरिकेला फसवलं?

इराणने होर्मुझमध्ये रचले चक्रव्यूव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील राजीकय वर्तुळात सध्या या रणनीवत चर्चा सुरु आहे. अमेरिका जोपर्यंत त्यांच्या जहाजांची नाकेबंदी थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी केली जाणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी होर्मुझ समुद्रात तेल आणि इतर व्यापारी जहाजे रोखून धरली आहे. जेणेकरुन इराण गुडघे टेकण्यास मजबूर होईल.

याविरोधात इराणने आक्रमक पवित्रा घेत, जोपर्यंत जहाजांची सुटका होत नाही तोपर्यंत अणु कार्यक्रमावर कोणतीही चर्चा न करण्याचे ठरवले आहे. IRGC चे प्रमुख मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी यासाठी नवा प्लॅन आखला आहे.

इराण लष्करी आणि कुटनीतिक खेळण्याच्या तयारीत

सध्या इराण होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करण्याची योजना आखत आहे. याशिवाय इराण (Iran) ओमानच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर या कृतीला कायदेशी वैधता मिळवूनदेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे रेड लाईन न ओलांडता अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवणे इराणला सोपे जाईल.

शस्त्रसंधीचा गैरवापर

काही अहवालांनुसार, इराणने युद्धबंदीच्या काळात आपली लष्करी ताकद वाढवली आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन साठा पुन्हा केला असून अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी हुथी बंडखोरांच्या मदतीने बाब अल-मंडेब सामुद्री मार्गांवर जहाजांवर हल्ले वाढवण्याच्या तयारीत आहे.

अमेरिकेची भूमिका

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ट्रम्प सरकारने इराणविरोधात मॅक्सिमम प्रेशर रणनीतीचा वापर केला आहे. होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत इराणच्या जहाजांची नाकेबंदी करुन आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इराणचे केल आणि इतर व्यापारात अडथळा आणून इराणला नमतं करण्याची अमेरिकेची योजना आहे. इराणला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अन्यथा मोठ्या लष्करी कारवाईचे संकेतही त्यांनी दिली आहे.

दोन्ही देशांमध्ये आता आर पारची लढाई होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु इराणने एकीकडे अणू कार्यक्रमावरील पकड घट्ट करणे आणि जागतिक जलमार्गावर आपले वर्चस्व निर्माणाच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांना दुहेरी पेचात टाकले आहे.

Trump Putin Talk : युद्ध थांबणार? ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवर प्रदीर्घ चर्चा; इराण युद्धविरामाबाबत मोठे भाष्य

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra