Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Uttar Pradesh Crime: डोळ्यात मिरचीपूड, फावड्याच्या दांड्याने वार अन् सासऱ्याची हत्या; शिक्षिका सुनेचा थरारक कट, कारण काय?

Uttar Pradesh Crime: डोळ्यात मिरचीपूड, फावड्याच्या दांड्याने वार अन् सासऱ्याची हत्या; शिक्षिका सुनेचा थरारक कट, कारण काय?

  • संपत्तीच्या वादातून शिक्षिका सुनेने सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप.
  • डोळ्यात मिरचीपूड टाकून फावड्याच्या लाकडी दांड्याने वार करून हत्या.
  • पोलिसांनी चार तासांत मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली.
उत्तरप्रदेश:उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिका असलेल्या सुनेने आपल्या सासऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सुनेने आधी डोळ्यात मिरचीपूड टाकली त्यांनतर इतर साथीदारांच्या मदतीने फावड्याच्या लाकडी दांड्याने डोक्यावर गंभीर वार करून त्यांचा जीव घेतला. हत्या केल्यांनतर मृतदेहाची विल्हेवाट देखील लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.

Palghar Crime: 8 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी निघाली अन् घडलं भयंकर; सासऱ्याच्या धक्क्याने सुनेचा जागीच मृत्यू

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सच्चाराम गुप्ता असे आहे. सच्चाराम गुप्तता यांना दोन मुले आहेत. त्यांची मोठी सून शोभा हिची मागणी होती की सासऱ्याने सगळी संपत्ती तिच्या नावावर करावी. मात्र सच्चाराम यांना आपल्या दोन्ही मुलांना संपत्तीचा समान वाटा द्यायचा होता. याच कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होता आणि हे प्रकरण दिवाणी न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. तरीही वाद काही मिटला नाही. यामुळे सुनेने आपल्या सासऱ्यांची हत्या करण्याचं ठरवलं.

कशी केली हत्या?

सुनेने सासऱ्यांना वाटाघाटीच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. गप्पा मारत असतांना हा वाद विकोपाला गेला. शोभाने सासऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, ज्यामुळे ते वेदनेने जमिनीवर कोसळले. त्यांनतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या रमेश गुप्ता आणि धनई यादव या कथित डॉक्टराने त्यांना पकडून ठेवले, तर शोभाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सासऱ्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सच्चाराम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीकांत चौहान नावाच्या व्यक्तीला बोलावून मृतदेहाचा चेहरा कपड्याने बांधण्यात आला आणि रात्रीच्या वेळी तो शेजारच्या रिकाम्या भूखंडात फेकून देण्यात आला.

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी केवळ चार तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. हत्येत वापरलेला लाकडी दांडा आणि इतर महत्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या सर्व आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra