Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वादळ आलंय.! पोलार्डचा 'हा' रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार 'किंग'

वादळ आलंय.! पोलार्डचा 'हा' रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार 'किंग'

जोस बटलर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज टी 20 मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड होणार नावावर
केवळ 24 रन्सची आयहे आवश्यकता

T20 Cricket Most Runs Record: जोस बटलरहा इंग्लंडचा सर्वाधिक आक्रमक फलंदाज आणि यशस्वी विकेटकिपर म्हणून ओळखला जातो.

सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ या क्रिकेट स्पर्धेत स्फोटक फलंदाज आणि विकेटकिपर जोस बटलर याने 31 जुलै रोजीच्या सामन्यात तुफानी खेळी केली आहे. त्याने 55 रन्स करत शानदार अर्धशतक लगावले आहे. तसेच लवकरच एक नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.

मॅंचेस्टर सुपर जायंट्सकडून जोस बटलरने 55 रन्सची खेळी केली आहे. या शानदार खेळीच्या जोरावर जोस बटलर आता टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाजाच्या यादीत पुढे जाण्यासाठी केवळ 24 रन्स दूर आहे. पुढील सामन्यात 24 रन्स करताच टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे.

जोस बटलरची टी 20 क्रिकेटमधली आकडेवारी

सामने – 520
खेळलेल्या इनिंग- 490 डाव
एकूण रन्स – 14,780 रन्स

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

जोस बटलर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत 31 जुलैच्या सामन्यात 55 रन्सची धडाकेबाज खेळी केली. सध्या वेस्ट इंडिजच्या कायरान पोलार्डच्या सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आहे. पुढील सामन्यात आणखी 24 रन्स करताच जोस बटलरकडे टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या हाय-व्होल्टेज क्रिकेट स्पर्धेचा थरार सध्या ऐन भरात आला आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकूण १४ सामने खेळवले गेले असून गुणतालिकेतील समीकरणे अत्यंत रंजक झाली आहेत. स्टार फलंदाज जोस बटलरच्या मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले असून, थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी पुढील सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर कायरन पोलार्ड टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रणस करणारा खेळाडू ठरला आहे. सध्या सर्वाधिक रन्स टी 20 मध्ये करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. मात्र आता केवळ 24 रन्स करताच हा रेकॉर्ड इंग्लंडचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या जोस बटलरच्या नावावर होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra