Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् 'या' खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी.

वादळी कामगिरी! Commonwealth मध्ये मेडल अन् 'या' खेळाडूंचा MP सरकार करणार सन्मान; 25 लाख अन् सरकारी.

  • कॉमनवेल्थ जिंकणाऱ्या खेळाडूंचे मध्यप्रदेश सरकारकडून कौतुक
  • यामिनी मौर्य आणि अजय बाबू यांनी जिंकले पदक
  • प्रत्येकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर
Commonwealth Games 2026: सध्या स्कॉटलंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे.
या मध्ये अनेक भारतीय खेळाडू यांनी देशासाठी पदके जिंकली आहेत. त्यातच यामिनी मौर्य आणि अजय बाबू या मध्यप्रदेशच्या रहिवासी असलेल्या खेळाडूंनी भारतासाठी पदक जिंकले आहे. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केला आहे. क्रीडा मंत्री यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडू शानदार कामगिरी करत आहे. मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीवर राज्याचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी त्यांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे. राज्याची कन्या यामिनी मौर्यहिने ज्युडो प्रकारात आणि अजय बाबू याने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून मध्य प्रदेशसह संपूर्ण देशाचा गौरव वाढवला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताचा आणि मध्य प्रदेशचा अभिमान उंचावणाऱ्या खेळाडूंचे कौतुक राज्य सरकारने केला आहे. यामिनी मौर्य आणि अजय बाबू या दोघांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच या दोन्ही खेळाडूंना सरकारी नोकरी देणार असल्याचे क्रीडा मंत्री व युवा कल्याण मंत्री विश्वास सारंग यांनी जाहीर केले आहे.

Commonwealth Games 2026: अस्मिता डे ने रचला इतिहास, Judo मध्ये कमावले पहिले Gold Medal; भारताची मान उंचावली

मध्यप्रदेश सरकारने आणि क्रीडा मंत्री विश्वास सारंग यांनी आगामी ‘जनविश्वास कार्यक्रमा’ची घोषणा केली आहे. येत्या ७ ऑगस्टपासून संपूर्ण मध्य प्रदेशात एकाच वेळी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतील. मध्य प्रदेश सरकार सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहे. शासन आणि प्रशासनाला नागरिकांच्या अधिक जवळ आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यामिनी मौर्य या मध्य प्रदेशच्या रहिवासी आहेत. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर टयांनी भारतीय ज्युडो खेळात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ च्या 57 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात शानदार खेळ करत तिने रौप्य पदक जिंकले आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.

वादळ आलंय…! पोलार्डचा 'हा' रेकॉर्ड Jos Buttler तोडणार; केवळ 24 रन्स अन् बनणार 'किंग'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra