Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, 'मला रेकॉर्ड्स नकोत, पण. १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

Vaibhav Sooryavanshi: ३ धावांनी शतक हुकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, 'मला रेकॉर्ड्स नकोत, पण. १५ वर्षीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

  • वैभव सूर्यवंशीने गाजवले मैदान
  • रेकॉर्ड्स नकोत, IPL ट्रॉफी हवी
  • सूर्यवंशीचे मोठे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या प्लेऑफ एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादवर दणदणीत विजय मिळवला.
राजस्थानने हैदराबादचा पराभव करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. न्यू चंदीगढ मुल्लानपूरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थानने सर्वच विभागांत वर्चस्व राखले. राजस्थानचा सामना शुक्रवार, २९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार असून विजेता संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे.

IPL 2026: अरारा खतरनाक! अवघ्या 15 व्या वर्षी 680 पैकी 610 धावा चौकारातून, 65 सिक्सरचा डोंगर, Vaibhav Sooryavanshi चा धडाका

वैभव सूर्यवंशीने गाजवले मैदान

या सामन्यात विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी करत संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. तसेच, या सामन्यात सूर्यवंशीला त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यादरम्यान सूर्यवंशीने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. त्याने ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड देखील मोडला.

विक्रम नकोत, आयपीएल ट्रॉफी हवी

विशेष म्हणजे, आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याची संधी केवळ तीन धावांनी हुकली. मात्र, वैभवला याची फारशी खंत नव्हती. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, "मला विक्रमांपेक्षा आयपीएल ट्रॉफी जिंकणे अधिक महत्त्वाचे वाटते. शतके पुढेही करता येतील, पण संघासाठी योगदान देणे आणि ट्रॉफी जिंकणे हेच माझे लक्ष्य आहे.

वैभव सूर्यवंशीने आपल्या सामन्यापूर्वीच्या तयारीबद्दलही सांगितले. सूर्यवंशी म्हणाला, सामन्यापूर्वी मी विरोधी संघाचे गोलंदाज, खेळपट्टी आणि मैदानाच्या सीमांचा बारकाईने अभ्यास करतो. मात्र मैदानात उतरल्यावर तो फक्त सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देतो. सुरुवातीपासून आक्रमक क्रिकेट खेळल्यास गोलंदाजांवर पूर्णपणे दबाव जातो. असेही त्याने स्पष्ट केले.

राजस्थान रॉयल्सची दमदार कामगिरी

राजस्थान रॉयल्ससाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे संघातील प्रमुख खेळाडू सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीत चमकत आहेत, तर जोफ्रा आर्चर आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा राजस्थान आणि गुजरात यांच्यातील क्वालिफायर २ सामन्याकडे लागल्या आहेत. राजस्थानने हीच लय कायम ठेवली, तर अंतिम फेरीचे तिकीट राजस्थानला मिळण्याची शक्यता आहे.

'मला कोणी सांगितलंच नाही…' वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra