- 'बेबी बॉस'वर फिदा 'युनिव्हर्सल बॉस
- सूर्यवंशीसाठी ख्रिस गेलची खास पोस्ट
- सूर्यवंशीचे ६ ऐतिहासिक विक्रम
ख्रिस गेलही झाला वैभवचा फॅन
वैभवच्या या विस्फोटक खेळीने प्रभावित होत ख्रिस गेलने स्वतः सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले. सामन्यानंतर गेलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर स्क्रीनवरील वैभवचे फोटो शेअर करत त्याला "नवीन सिक्स मशीन" अशी खास उपाधी दिली. गेलने सोशल मीडियावर वैभवच्या फलंदाजीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, "कार्नेज वैभव सूर्यवंशी… दुर्दैवी! पण तू सुद्धा तिथे पोहोचशील." क्रिकेटमध्ये 'कार्नेज' हा शब्द अशा फलंदाजासाठी वापरला जातो जो गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करतो. सर्वात जलद शतकाचा विक्रम थोडक्यात हुकल्यामुळे गेलने त्याला दुर्दैवी म्हटले, पण भविष्यात तो हा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वासही व्यक्त केला.
क्रिकेटमध्ये 'कार्नेज' हा शब्द अशा फलंदाजासाठी वापरला जातो जो गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करतो. सर्वात जलद शतकाचा विक्रम थोडक्यात हुकल्यामुळे गेलने त्याला दुर्दैवी म्हटले, पण भविष्यात तो हा विक्रम नक्की मोडेल, असा विश्वासही व्यक्त केला. यानंतर ख्रिस गेलने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टोरी शेअर करत वैभवचे कौतुक केले. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अप्रतिम वैभव सूर्यवंशी, आयपीएलचा नवा सिक्स मशीन." टी२० क्रिकेटमध्ये षटकारांचा बादशाह मानल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने एका भारतीय तरुण फलंदाजाला "नवीन सिक्स मशीन" म्हणणे, ही वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेची मोठी पावती मानली जात आहे.
वैभव सूर्यवंशीचे या हंगामातील ६ ऐतिहासिक विक्रम
- एका हंगामात अनकॅप्ड खेळाडूकडून सर्वाधिक धावा - ६८० धावा
- आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार - ६५ षटकार
- आयपीएल इतिहासात २००+ स्ट्राईक रेटने ६०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज
- आयपीएल प्लेऑफ/नॉकआऊट सामन्यात सर्वाधिक षटकार - १२ षटकार
- सर्वात कमी चेंडूंमध्ये १० षटकार मारण्याचा विक्रम - फक्त २४ चेंडू
- आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार - ८ षटकार
राजस्थानला फायनलकडे नेणारा 'बेबी बॉस'
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देण्यात वैभव सूर्यवंशीची खेळी निर्णायक ठरली. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानने अंतिम फेरीकडे दमदार पाऊल टाकले आहे.ऑरेंज कॅपवर वैभवचा कब्जा
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ डावांत तब्बल ६८० धावा केल्या असून तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. आता फायनलमध्ये पोहचण्यासाठी राजस्थान रॉयल्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. हे दोन्ही संघ शुक्रवारी क्वालिफायर २ मध्ये आमनेसामने भिडणार आहेत.

