Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला 'हा' महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला 'हा' महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

वैभव सूर्यवंशीने केली 96 रन्सची आक्रमक खेळी फरेराने शेवटच्या ओव्हर्समध्ये लुटल्या 27 रन्स
गुजरात टायटन्ससमोर 215 रन्सचे टार्गेट

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2 Live Updates: चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये क्वालिफायर 2 चा सामना सुरू आहे.

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 215 रन्सचे टार्गेट दिले होते. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली. त्याने महत्वपूर्ण अशा 96 रन्स केल्या. त्याच्या जोरावर राजस्थानने 200 पार टार्गेट पूर्ण केले. मात्र या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

राजस्थानचा संघ सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अडचणीत सापडला होता. मात्र समोर विकेट्स जात असताना देखील वैभव सूर्यवंशीने तग धरून ठेवला. तसेच त्याने एक शानदार आणि आक्रमक खेळी केली. मात्र या सामन्यात देखील शतकापासून दूर राहिला. त्याने 96 रन्सची खेळी केली. मात्र या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पूर्ण आयपीएल हंगामात शानदार खेळी केली आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील सर्वात वेगवान 1000 रन्स करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आजच्या सामन्यात आवश्यक असताना वैभव सूर्यवंशीने 96 रन्सची खेळी केली. सध्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक रन्स केल्या आहेत. वैभव सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra