Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सातारा, दि. १ (प्रतिनिधी) : सातारा नगरपालिकेच्या १७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात शनिवारी विविध सामाजिक, पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधत नगरपालिकेने स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी जनजागृती पदयात्रा काढली.

शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळी नगरपालिकेच्या परिसरातून पदयात्रेला प्रारंभ झाला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी वातावरण भारावून गेले. विविध विभागांची वाहने, स्वच्छता अभियानाची माहिती देणारे फलक आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे घोषवाक्य यामुळे रॅलीचे आकर्षण अधिक वाढले. शहरातून मार्गक्रमण करत रॅलीने अनेक ऐतिहासिक व सामाजिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.

या निमित्ताने क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापुरुषांच्या विचारांमधून समाजात समता, शिक्षण, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

खामगावात ढगफुटीसदृश पाऊस; जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यांना फटका

रॅलीचा समारोप शिवतीर्थ येथे झाला. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश देत शहर अधिक हिरवेगार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमात नगरपालिकेचे विविध विभाग, अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छ शहर, सक्षम नागरी सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास या संकल्पनांना नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन्‌ कचरा नियोजनासाठी प्रशासनाला डेडलाईन

याप्रसंगी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, आरोग्य सभापती धनंजय (भाऊ) जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, उपसभापती सुजाता गिरी-गोसावी, शिक्षण सभापती शंकर किर्दत, समाजकल्याण सभापती संकेत साठे, नगरसेवक शंकर (भाऊ) माळवदे, राजू गोरे, फिरोज पठाण, रविराज किर्दत, मुख्याधिकारी विनोद झळक यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra