होम
Varun- Natasha wedding | लग्नाआधीच वरूण- नताशाचा वेडिंग ड्रेस सोशल मीडियावर चर्चेत, खूप सुंदर दिसेल नताशा 'या' ड्रेसमध्ये नेटकऱ्यांनी दिली पावती!

लेहेंग्याच्या फोटोवरून नताशाने लग्वासाठी पेस्टल शेड निवडली असल्याचं समजत आहे. या लेहेंग्यावर बीड्स आणि डायमंडचे वर्क केले आहे. या आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसणार आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या भल्या मोठ्या मॅन्शनमध्ये हा सोहळा होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला रवाना होतील. अलिबागमधील बरेच व्हिला अतिथींसाठी बुक करण्यात आले आहेत.
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. आजपासून लग्नाची लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, वरुणच्या वधूचा अर्थात नताशाच्या 'लेहेंग्या'चा फोटो समोर आला आहे. वास्तविक, या इव्हेंट टीमचे सदस्य काल संध्याकाळी वेडिंग आऊटफिट्ससह नताशाच्या घरी पोहोचले होते. त्यावेळेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
लेहेंग्याच्या फोटोवरून नताशाने लग्वासाठी पेस्टल शेड निवडली असल्याचं समजत आहे. या लेहेंग्यावर बीड्स आणि डायमंडचे वर्क केले आहे. या आऊटफिटमध्ये नताशा खूपच सुंदर दिसणार आहे.
View this post on Instagram
तर दुसरीकडे, लग्नाचे ठिकाणही सजवले जात आहे, तिथले फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. वरुण-नताशाचे लग्न अलीबागच्या एका मॅन्शनमध्ये पार पडणार आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या भल्या मोठ्या मॅन्शनमध्ये हा सोहळा होणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल आज आपल्या कुटूंबियांसह अलिबागला रवाना होतील. अलिबागमधील बरेच व्हिला अतिथींसाठी बुक करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
हे सुद्धा वाचा
वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमांची सुरुवात संगीत सोहळ्याने होईल. वरुणचे बॉलिवूडमधील मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.