Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'वेळ येऊद्या मग .'; 'गुंगी गुडिया' वादावर सुनेत्रा पवार यांची पहिली सूचक प्रतिक्रिया, वातावरण आणखी तापणार !

'वेळ येऊद्या मग .'; 'गुंगी गुडिया' वादावर सुनेत्रा पवार यांची पहिली सूचक प्रतिक्रिया, वातावरण आणखी तापणार !

  • ‘गुंगी गुडिया’ वादावर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
  • काँग्रेस माफी मागण्यास नकार; राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
  • “वेळ येऊद्या मग मी बोलते,” म्हणत सुनेत्रा पवार यांनी दिले संकेत

काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा “गुंगी गुडिया” असा उल्लेख केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता स्वतः सुनेत्रा पवार यांनी यावर पहिली सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अशा प्रकारच्या टीकेला भविष्यात गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसने माफी मागावी, अशी भूमिका मांडली आहे.

‘वेळ येऊद्या मग मी बोलते’

या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी सध्या अधिक भाष्य करण्याचे टाळले. माध्यमांशी बोलताना त्यांनी केवळ, “वेळ येऊद्या मग मी बोलते,” एवढेच सांगितले. त्यांच्या या एका वाक्यामुळे आगामी काळात त्या या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गांधी भवनातील गोंधळावर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; 'काँग्रेस कार्यालयावर हल्ल्यामागे भाजप व पोलिसांची फूस'

काँग्रेसचा माघार घेण्यास नकार

वाद वाढत असतानाही काँग्रेसने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. कोणत्याही दबावाखाली माफी मागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी प्रतीक्रिया देत “काँग्रेस नेते व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मौनी बाबा म्हटले होते तर इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले होते पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान दिलेले आहे, त्यांनी आपल्या कार्यातून उत्तर दिले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कार्यातून उत्तर द्यावे,” असे म्हंटले आहे.

'गुंगी गुडिया' वादावर एकनाथ शिंदे संतापले; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी

राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता

काँग्रेसच्या व्हिडीओमुळे सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे नेते माफीची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणावर आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra