Dailyhunt
व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

व्हेज स्टार्टर्ससाठी पदार्थ शोधताय? मग कुरकुरीत Threaded Paneer ठरेल परफेक्ट पर्याय, रेसिपी नोट करा

  • थ्रेडेड पनीर हा एक स्टार्टर्सचा प्रकार आहे.
  • यात मसालेदार मऊ पनीरला बारीक शेऱ्यांमध्ये कोट करुन फ्राय केले जाते.
  • पार्टी स्नॅन्ससाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय ठरते.
भारतीय स्वयंपाकात पनीरचे अनेक प्रकार आढळतात, पण सादरीकरणात वेगळेपणा आणणाऱ्या काही रेसिपीज खास लक्ष वेधून घेतात.\थ्रेडेड पनीर ही अशीच एक आकर्षक आणि चविष्ट डिश आहे.
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा कॉम्बिनेशन खूपच स्वादिष्ट लागतो. पार्टी, किटी, किंवा खास पाहुण्यांसाठी काहीतरी हटके बनवायचं असेल तर थ्रेड पनीर उत्तम पर्याय आहे.

Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर "ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम"

याची रचना पाहूनच खाण्याची उत्सुकता वाढते आणि एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही टेस्टी रेसिपी ट्राय करु शकता. निवडक साहित्यांपासून ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवता येते. मुख्य म्हणजे याची चव इतकी लाजवाब लागते की लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव प्रेमात पाडते. चला तर मग थ्रेडेडे पनीरची रेसिपीनोट करुन घेऊयात.

साहित्य:

  • पनीर: २०० ग्रॅम (लांब आकाराचे तुकडे)
  • स्प्रिंग रोल शीट्स: ३-४ (अगदी बारीक धाग्यांसारखे कापलेले)
  • मैदा: ४ चमचे (कोटिंगसाठी)
  • कॉर्नफ्लॉवर: २ चमचे (कोटिंगसाठी)
  • आलं-लसूण पेस्ट: १ चमचा
  • शेजवान सॉस: २ चमचे
  • सोया सॉस: १/२ चमचा
  • टोमॅटो केचप: १ चमचा
  • मिठ: चवीनुसार
  • काळी मिरी पूड: १/४ चमचा
  • तेल: तळण्यासाठी
कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आलं-लसूण पेस्ट, शेजवान सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पूड एकत्र करा. यात पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने मिक्स करा आणि १०-१५ मिनिटे झाकून ठेवा.
  • मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थोड्या पाण्यात मिक्स करून पातळ पेस्ट तयार करा.
  • पनीरचा एक तुकडा घ्या, तो मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवा.
  • आता हा तुकडा बारीक चिरलेल्या स्प्रिंग रोल शीटच्या पट्ट्यांवर ठेवा आणि हलक्या हाताने दाबा जेणेकरून शीट्स पनीरला चिकटतील.
  • यानंतर कढईत तेल गरम करा आणि तयार केलेले थ्रेडेड पनीरचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • गरम आणि कुरकुरीत थ्रेडेड पनीर शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra