Thursday, 04 Mar, 7.53 am नवराष्ट्र

मनोरंजन
Video | नवीन मालिका: शिर्षक गीताच्या प्रेमात पडलेत प्रेक्षक, Video पाहून करतायत कलाकारांच कौतुक!

या मालिकेत शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत मालिकेत तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत.

    म्युझिक अल्बम आणि चित्रपटांसोबत मालिकांची या मालिकेत शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत मालिकेत तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत.रसिकांचं लक्ष वेधून घेतात. अनेकदा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात पण वर्षानुवर्षे त्यांची शीर्षकगीतं प्रेक्षकांच्या ओठी तशीच असतात. झी मराठीवरील 'आभाळमाया', 'वादळवाट' पासून ते आता 'येऊ कशी तशी मी नांदायला' पर्यंत अनेक मालिकांची शीर्षकगीतं आजवर गाजली अजरामर झाली. कॉलर ट्यून, रिंग टोन च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या जवळ राहिली. सर्व समारंभात ही गाणी वाजवली देखील गेली.

    सध्या चालू असलेल्या मालिकांमध्ये 'लाडाची मी लेक गं', 'कारभारी लयभारी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'अग्गबाई सासूबाई', 'माझा होशील ना', 'देवमाणूस' आणि नुकतीच सुरु झालेली 'येऊ कशी तशी मी नांदायला' ह्या मालिकांची शीर्षकगीतं खूप गाजतयात. त्यातच आता आणखी एका शीर्षकगीताची भर पडली आहे. 'पाहिले न मी तुला' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र त्यापूर्वी या मालिकेचं शीर्षकगीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. अभिनेता शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेचं शीर्षकगीत आनंदी जोशीने गायलं असून वैभव जोशींनी गीत लिहिलं आहे. तर समीर सप्तिस्कर यांनी संगीतबद्ध केलंय. सोशल मीडियावर या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. झी मराठीने सोशल मीडियावर हे गाणं कसं संगीतबद्ध झालंय, त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

    या मालिकेत शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत मालिकेत तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत. शशांकने याआधी मालिकेचा प्रोमो शेअर करत, 'आता कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे', असं म्हटलं होतं. 'पाहिले न मी तुला' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

    हे सुद्धा वाचा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra
Top