Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vidhan Parishad Election 2026: ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

Vidhan Parishad Election 2026: ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

  • ठरलं तर!
  • विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध
  • ९ जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?
MaharashtraVidhan Parishad Election 2026:विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता.
रिक्त असलेल्या ९ जागांसाठी अखेर ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र ऐनवेळी भाजपने माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आहे.

जागांचे पक्षनिहाय गणित

९ जागांच्या कोट्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने खालीलप्रमाणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत:

भाजप: ५ उमेदवार

शिवसेना (शिंदे गट): २ उमेदवार

राष्ट्रवादी (अजित पवार गट): १ उमेदवार

शिवसेना (ठाकरे गट): १ उमेदवार

उद्धव ठाकरेंच्या ऐवजी अंबादास दानवेंची एन्ट्री

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे उमेदवार असते तर भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसने त्यांना विरोध न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने सुरुवातीला नाराजी व्यक्त केली असली तरी, अखेर दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील पेच सुटला आहे.

भाजप उमेदवार

सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे,
प्रमोद जठार,
प्रज्ञा सावंत (विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत)

Harshwardhan Sapkal: विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा, हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर केली भूमिका

शिवसेना शिंदे गट

नीलम गोऱ्हे
बच्चू कडू

राष्ट्रवादी अजित पवार गट

झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट

अंबादास दानवे

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज ३० एप्रिल २०२६ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यानंतर, २ मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना ४ मे पर्यंत आपली उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. जर आवश्यकता भासली, तर १२ मे रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी सुरू होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra