Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Weight Loss Tips:  Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! 'या' सोप्या टिप्सने वजन करा कमी

Weight Loss Tips: Belly Fat कमी करायचंय? डाएटची गरज नाही! 'या' सोप्या टिप्सने वजन करा कमी

  • Belly Fat कमी करायचंय?
  • डाएटची गरज नाही
  • ‘या’ सोप्या टिप्सने वजन करा कमी
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेले वजन आणि पोटावरील चरबी ही अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. . ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम करणे, बाहेरचे तेलकट पदार्थ, अनियमित झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे बेली फॅट झपाट्याने वाढते.
विशेष म्हणजे पोटाभोवती जमा होणारी अतिरिक्त चरबी केवळ दिसण्यावर परिणाम करत नाही, तर डायबिटीज, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढवते. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट, उपाशी राहणे किंवा जेवण टाळण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र फिटनेस कोचच्या मते, वजन कमी करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवण्याची गरज नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयींच्या मदतीने बेली फॅट कमी करता येऊ शकते.

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा 'हे' व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

संतुलित आहार खा

वजन कमी होण्यात सुमारे ७० टक्के भूमिका योग्य आहाराची असते. आहारात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश केल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. नारळपाणी, फळे, ड्रायफ्रूट्स आणि सीड्स यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो. तसेच प्रोसेस्ड फूड आणि साखरयुक्त पदार्थ टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

वॉकिंग करा

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी नियमित चालणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज १० हजार ते १२ हजार पावले चालल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. जेवणानंतर काही वेळ चालणे, सकाळी वॉक करणे किंवा हलका कार्डिओ व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय योगा, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पोहणे यांसारखे व्यायामही शरीर फिट ठेवण्यास मदत करतात.

झोप आणि शरीराला विश्रांती

शरीराला पुरेशी झोप आणि योग्य विश्रांती देणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. दररोज ७ ते ८ तास झोप घेतल्याने शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते. त्यामुळे झटपट परिणाम मिळवण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा करण्यापेक्षा संतुलित जीवनशैली स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा 'ही' ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra