Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
WhatsApp Username Feature: 'यूजरनेम' फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले

WhatsApp Username Feature: 'यूजरनेम' फीचरवर केंद्राची मेटाला नोटीस, 3 दिवसांत स्पष्टीकरण मागितले

  • WhatsApp च्या ‘Username’ फीचरवर केंद्र सरकारने आक्षेप नोंदवला आहे.
  • मेटाला तीन दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • सरकारने हे फीचर सध्या भारतात लागू न करण्यास का सांगितले, जाणून घ्या.
व्हॉट्सॲपनेनुकतेच सादर केलेल्या ‘यूजरनेम’ फीचरमुळे आता वापरकर्त्यांना मोबाईल नंबर शेअर न करताही इतरांशी संवाद साधता येणार आहे. मात्र, या नव्या सुविधेच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली असून, व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाला नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्र सरकारने मेटाला व्हॉट्सॲपच्या ‘यूजरनेम’ फीचरबाबत तीन दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावर सरकारसोबत चर्चा आणि सल्लामसलत पूर्ण होईपर्यंत भारतात हे फीचर रोलआउट करू नये, असेही सांगण्यात आले आहे.

आनंदाची बातमी! स्वदेशी AI क्लाऊडला मिळाली नवी दिशा; ESDS ने लॉन्च केले 'स्वराज क्लाऊड'

व्हॉट्सॲपने काय सांगितले?

व्हॉट्सॲपने सांगितले आहे की प्रत्येक यूजरनेम वेगळा आणि युनिक असेल. काही महत्त्वाची किंवा प्रसिद्ध नावे आधीच सुरक्षित ठेवण्यात येतील, जेणेकरून त्यांची नक्कल करता येणार नाही. तसेच, व्हॉट्सॲप कोणतीही सार्वजनिक यूजरनेम डायरेक्टरी तयार करणार नाही, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा यूजरनेम माहीत असेल तरच त्याद्वारे संपर्क साधता येईल.

फीचरमुळे गोपनीयता वाढणार, पण सुरक्षेची चिंता

व्हॉट्सॲपच्या मते, या फीचरमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक मजबूत होणार आहे. आतापर्यंत व्हॉट्स ॲपवर एखाद्या नवीन व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. आता मात्र यूजर स्वतःचा वेगळा ‘यूजरनेम’ तयार करून त्याद्वारे संवाद साधू शकणार आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीला मोबाईल नंबर दिसणार नाही. मात्र, सरकारला भीती आहे की या सुविधेचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार बनावट ओळख तयार करू शकतात. एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती, कंपनी किंवा संस्थेच्या नावासारखा यूजरनेम तयार करून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Tech News: १०० स्पीड लेव्हल असलेला हँडहेल्ड फॅन लॉंच! प्रवास आणि दैनंदिन वापरासाठी परफेक्ट गॅझेट

ऑनलाइन फसवणुकीचे नवे मार्ग निर्माण होणार

सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, यूजरनेमच्या माध्यमातून ओळख लपवणे सोपे झाल्यास ऑनलाइन फ्रॉड आणि बनावट प्रोफाइलच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर बनावट यूजरनेम आणि फेक प्रोफाइलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲपपच्या नव्या सुविधेचा वापर सुरक्षित पद्धतीने होईल का, याची सरकारकडून तपासणी केली जात आहे. व्हॉट्सॲपने कालच याबाबतचे संकेत दिले होते. मात्र, केंद्र सरकारला यावर शंका उपस्थित झाल्याने केंद्राने त्याला तातडीने मान्यता दिली नव्हती. अशात या नव्या फिचरला आता देशात स्थगितीच देण्यात आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra