Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Why No Bridges on Amazon River: जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक; पण 'या' नदीवर एकही पूल का नाही?

Why No Bridges on Amazon River: जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक; पण 'या' नदीवर एकही पूल का नाही?

Why No Bridges on Amazon River: जगात अनेक नद्या आहेत आणि बहूतांश नद्यांवर लहान मोठे पूल बांधले आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आपल्याला असे नेत्रदीप पुल पाहायला मिळतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे की, जगामध्ये अशीही एक नदी आहे, जिच्यावर आजतागायत एकही पूल बांधता आलेला नाही.

चला तर मग जाणून घेऊया या नदीवर पूल न बांधण्यामागची कारणे…

जगातला दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ॲमेझॉन नदीवर आजतागायत एकही पुल नाही. ॲमेझॉन नदीवर पुल न बांधण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथील भौगोलिक रचना आणि आजूबाजूचा परिसर आहे. या नदीच्या किनाऱ्यांवरची माती अत्यंत मऊ आणि दलदलीची आहे. अशा परिस्थितीत तिथे पुलाचे मजबूत खांब (Pillars) उभारणे अभियंत्यासाठी (Engineers) अत्यंत अवघड ठरते. जर येथे पुल बांधायचा झाल्यास बांधकाम खर्च अफाट वाढू शकतो, तसेच या नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि वेगही सातत्याने बदलत असल्याने कोणतेही बांधकाम करणे आव्हानात्मक ठरते.

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

ॲमेझॉन पुल बांधणे अधिक खर्चिक

ॲमेझॉन नदीच्या आजूबाजूला जगातील सर्वात मोठे वर्षावन पसरलेले आहे, ज्याला ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’ (Amazon Rainforest) म्हटले जाते. हा परिसर अतिशय घनदाट आणि कमी लोकसंख्येचा आहे. तसेच येथे पुल बांधण्याचा खर्च अब्जावधीमध्ये असल्याने हे काम परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आणि अभियंत्यांनी येथे पुल बांधण्यास प्राधान्य दिले नाही. येथील लोक प्रवासासाठी बोटी आणि जलवाहतुकीच्या इतर साधनांचा वापर करतात.

विस्तारित स्वरूपाची नदीची रूंदी

पेरू (Peru) देशातील अँडीज पर्वतातून उगम पावणाऱ्या ॲमेझॉन नदीची रूंदीही मोठी आहे. पावसाळ्यात या नदीच्या पाण्याच्या पातळीत इतकी वाढ होते की, या नदीच्या प्रवाहात जाणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही येथे पुल बांधणे सोपे काम नाही.

NEET Paper Leak: पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता थेट ‘लष्करा’कडे दिली जाणार प्रश्नपत्रिकांची जबाबदारी?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra