- रिपोर्ट्सनुसार Xiaomi त्यांच्या Mix Flip फोल्डेबल फोन लाईनअपला बंद करण्याचा विचार करत आहे.
- Weibo वरील लीकनुसार Mix Flip 3 लाँच होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
- वाढता उत्पादन खर्च आणि कमी रिटर्न हे या निर्णयामागचे संभाव्य कारण मानले जात आहे.
iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी
Mix Flip चे पुढील मॉडेल लाँच होणार नाही?
चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने दावा केला आहे की, टेक कंपनी शाओमी त्यांचा छोटा फोल्डेबल फोन म्हणजेच Mix Flip आता लाँच करणार नाही. कंपनीने आता या फोनची लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका यूजरने जेव्हा Mix Flip 3 बाबत प्रश्न विचारले तेव्हा DCS ने उत्तर देत दावा केला आहे की, कंपनी त्यांचा पुढील फ्लिप लाँच करणार नाही. मात्र रिपोर्टमध्ये अद्याप सांगितलं नाही की, कंपनी त्यांचा मोठा फोल्डेबल फोन म्हणजेच बुक स्टाइल फोल्डेबल फोन Mix Fold बंद करणार आहे की नाही. (फोटो सौजन्य - Xiaomi)
तथापी, चिनी ब्रँड शाओमीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही किंवा याबाबत कोणतीही माहिती देखील अधिकृतपणे शेअर केली नाही. यासोबतच कंपनीने प्रोडक्ट लाईनअप बंद करण्याचा निर्णय का घेत आहे, याचे कारण देखील अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले नाही. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, छोटे फोल्डेबल फोनचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्यातून फारसे मूल्य मिळत नाही. याच कारणामुळे कंपनी ही फोन लाईनअप बंद करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; 'सुपरफास्ट गाडी' आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार
Oppo ने देखील बंद केला फ्लिप फोन?
केवळ शाओमीच नाही तर चिनी कंपनी ओप्पोने देखील त्यांची फ्लिप फोन लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Oppo Find N3 Flip नंतर त्यांचे पुढील मॉडेल लाँच केले नाही. कंपनीने हा फ्लिप फोन 2023 मध्ये लाँच केला होता. शाओमाी आणि ओप्पो त्यांची फ्लिप लाईनअप बंद करत असतानाच दुसरीकडे मोटोरोलाने अलीकडेच त्यांची नवा फ्लिप फोन लाईनअप बाजारात लाँच केली आहे. यामध्ये Motorola Razr 70, Razr 70+ और Razr 70 Ultra या डिव्हाईसचा समावेश आहे.

