Dailyhunt
'या' प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! 'या' महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

'या' प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! 'या' महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

  • भारतात Renault Dustar चे नवीन जनरेशन सादर
  • जाणून घ्या फीचर्स
  • एप्रिल महिन्यात होऊ शकते डिलिव्हरी
भारतीय ऑटो बाजारात SUVसेगमेंटमधील वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. या सेगमेंटमध्ये आपल्या अनेक लोकप्रिय कार पर्याय पाहायला मिळतात.
अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे RenaultDuster.

अलीकडेच Renault India ने भारतात तिसऱ्या जनरेशनची Renault Duster सादर केली आहे. ही SUV ग्लोबल मॉडेलवर आधारित असून अधिक मॉडर्न आणि प्रीमियम लूकमध्ये आणण्यात आली आहे. कंपनीने पहिल्या जनरेशांची Duster 2022 मध्ये बंद केल्यानंतर आता थेट नव्या जनरेशनसह ही कार भारतीय बाजारात परतली आहे. चला, जाणून घेऊया या नव्या SUV मधील प्रगत फीचर्सबद्दल.

केबिन आणि फीचर्स

नव्या Duster च्या केबिनमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याचे डॅशबोर्ड डिझाइन बाहेरील बॉक्सी लुकशी सुसंगत आहे. यात 10.2 इंचांचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10 इंचांचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. यासोबत वायरलेस फोन चार्जिंग, अँबिएंट लाइटिंग आणि पॅनोरॅमिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर्सही उपलब्ध आहेत.

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

SUV मध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 6-वे पॉवर अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि पॉवर्ड टेलगेट देण्यात आले आहे. ग्राहकांच्या सेफ्टीसाठी 360 डिग्री कॅमेरा आणि 17 फीचर्ससह ADAS पॅकेज उपलब्ध आहे. याशिवाय 700 लिटरचा मोठा बूट स्पेसही मिळतो.

पावरट्रेन पर्याय

नव्या Duster मध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला Turbo TCe 160 पेट्रोल इंजिन असून ते 163 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 6-स्पीड DCT गिअरबॉक्स दिला आहे. दुसरा 1.8 लिटर E-Tech 160 स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिन आहे, ज्यामध्ये 1.4 kWh बॅटरी आणि 8-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, ही SUV शहरात सुमारे 80 टक्के वेळ इलेक्ट्रिक मोडमध्ये चालू शकते. तिसरा TCe 100 पेट्रोल इंजिन पर्याय 100 PS पॉवर देतो. SUV चे ग्राउंड क्लिअरन्स 212 मिमी आहे.

Tata Motors आणि Maruti Suzuki ला धडकी भरणार! Hyundai च्या 3 नवीन Cars ची मार्केटमध्ये होणार एंट्री

डिझाइन आणि लाँच

डिझाइनच्या दृष्टीने नवीन Duster ने आपला पारंपरिक बॉक्सी स्टाइल कायम ठेवला आहे. मात्र, नवीन हेडलॅम्प्स, कनेक्टेड LED टेललॅम्प्स आणि मजबूत बंपरसारखे आधुनिक घटक जोडण्यात आले आहेत. कंपनीने याची प्री-बुकिंग आधीच सुरू केली असून SUV मार्चमध्ये लॉन्च होणार आहे. टर्बो पेट्रोल व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबत कंपनीकडून 7 वर्षांची वॉरंटीही दिली जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra