Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Yavatmal News: वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

Yavatmal News: वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८३ पदे अद्यापही रिक्त! डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर वाढला ताण

वतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसमोरील डॉक्टरांच्या रिक्त पदांचा प्रश्न अद्याप कायम असून, विविध श्रेणीतील तब्बल ८३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावित होत आहेत.

शासनाकडून सातत्याने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असली आणि काही पदांवर नियुक्त्या झाल्या असल्या, तरी सर्व रिक्त जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. परिणामी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात सध्या ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि ४५० आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. या यंत्रणेद्वारे लाखो ग्रामीण नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. मात्र डॉक्टरांची कमतरता, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये, आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे.(फोटो सौजन्य - istock)

Yavatmal News: पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

सध्या गट ‘अ’ वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२९ पदे मंजूर असून त्यापैकी ७९ पदे नियमितपणे भरलेली आहेत. मात्र ५१ पदे अद्याप रिक्त आहेत. याशिवाय तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४० मंजूर पदे असून त्यातील ११ पदे रिक्त होती. त्यापैकी २ पदे बदलीद्वारे भरली गेली असली, तरी ९ पदे अजूनही रिक्त आहेत. गट ‘ब’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४३ मंजूर पदांपैकी १७ पदे नियमित भरलेली असून,१२ पदांवर तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली आहे. तरीदेखील चार पदे रिक्त असल्याने काही आरोग्य केंद्रांमध्ये नियमित वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी येत आहेत. याउलट, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या २१२ पदांवर १०० टक्के नियुक्त्या झाल्या आहेत.

एसडब्ल्यूसीच्या ४० पदांपैकी ३२ पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यूपीएससीमार्फत तीन वरिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, ११ रुग्णालयांतील डॉक्टरांची ११ पदेही भरली गेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची कमतरता ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील प्रमुख समस्या ठरत आहे. अनेक ठिकाणी एकाच डॉक्टरावर दोन ते तीन केंद्रांची जबाबदारी असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची वेळ येत असून, त्यातून वाढत आहेत. परिणामी गंभीर रुग्णांना तालुका नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहे.

Maharashtra Farmer Suicide: अजून किती बळी जाणार? कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; हृदयद्रावक घटना

आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आगामी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होईल. मात्र तोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करणे ही प्रशासनापुढील मोठी जबाबदारी ठरणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष ढोले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra