Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्.

युद्धाचे बिगुल वाजले! तब्बल 24 वर्षांनी आफ्रिकेत ICC World Cup 2027 चा महाकुंभ; ३ देश, १२ मैदाने अन्.

  • आयसीसीने वर्ल्डकप 2027 साठी जाहीर केली 12 ठिकाणे
  • 24 वर्षांनी होणार दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप 2027
  • वर्ल्डकप 2027 मध्ये होणार 57 वनडे सामने
South Africa/ Zimbabwe/ Namibia: आयसीसीने 2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2027स्पर्धेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
ICCपुरुषांच्या वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी 12 अधिकृत ठिकाणांची घोषणा केली आहे. 30 जुलै रोजी झालेल्या एका कार्यक्रमात या ठिकाणांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनी क्रिकेट वर्ल्डकपचे यजमानपद पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेकडे गेले आहे. 2027 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, जिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये आयोजित एका भव्य सोहळ्यात या यजमान शहरांची आणि स्पर्धेच्या ब्रँड लोगोची अधिकृत घोषणा करण्यात आली.

एकूण १२ मैदानांपैकी दक्षिण आफ्रिकेत ८, जिम्बाब्वेमध्ये ३ आणि नामिबियात 1 अशी ही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ती ठिकाणे कोणती आहेत त्याबाबत जाणून घेऊयात.

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

दक्षिण आफ्रिका

वांडरर्स स्टेडियम - जोहान्सबर्ग

सुपरस्पोर्ट पार्क - सेंच्युरियन

न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड - केपटाऊन

किंग्समीड क्रिकेट ग्राउंड - डर्बन

सेंट जॉर्जेस पार्क - गेकेबेरा

मंगांग ओव्हल - ब्लोमफॉन्टेन

बोलँड पार्क - पार्ल

बफेलो पार्क

झिम्बाब्वे

हरारे स्पोर्ट्स क्लब - हरारे

क्विन्स स्पोर्ट्स क्लब - बुलावायो

फाले मोसी-ओ-तुन्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम

नामिबिया

नामिबिया क्रिकेट ग्राउंड - विंडहोक

24 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप सामना होणार आहे. 2003 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांनी संयुक्तपणे वर्ल्ड कपचे आयोजन केले होते. आता २०२७ मध्ये २४ वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. 14 व्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 14 संघ खेळणार असून एकूण 57 सामने खेळवले जाणार आहे.

ICC चा गेमचेंजर निर्णय! 2027 वनडे वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला; 'सुपर 7' मुळे प्रत्येक सामना ठरणार निर्णायक

ICC चा गेमचेंजर निर्णय

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेली आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२७ (ICC Mens ODI World Cup 2027) आता नव्या स्वरूपात खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२७ च्या विश्वचषकाआधी स्पर्धेच्या स्वरूपात अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत १४ संघ सहभागी होतील. परंतु विश्वचषकापर्यंतचा मार्ग आता पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra