Saturday, 23 Jan, 4.19 pm नवराष्ट्र

होम
कौतुकास्पद | राज्यातील लसीकरण मोहिमेमध्ये पालघर जिल्हा ठरला अव्वल, ७९.७५ टक्के कोरोना योद्ध्यांनी घेतली लस

संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरण(corona vaccination) मोहिम जोरदारपणे शासन राबवत असून राज्यातील ३६ जिल्ह्यातील २५८ केंद्रावर १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्याने(palghar district) या लसीकरणामध्ये अव्वल क्रमांक पटकावत ३१९ (७९.७५)टक्के कोरोना योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

संतोष चुरी, पालघर: संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरण(corona vaccination) मोहिम जोरदारपणे शासन राबवत असून राज्यातील ३६ जिल्ह्यातील २५८ केंद्रावर १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्याने(palghar district) या लसीकरणामध्ये अव्वल क्रमांक पटकावत ३१९ (७९.७५)टक्के कोरोना योद्ध्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर उस्मानाबाद व भंडारा जिल्हा आहे. या मोहिमेत ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असताना लोकांच्या मनात त्याविषयी काही शंका ही उत्पन्न झाल्या होत्या. कोरोना लसीबाबत भारतात काही गैरसमज असताना लस घेतल्याने स्त्री किंवा पुरुषाला नपुसकत्व येते किंवा चेहरा अर्धांगवायू ने लुळा पडतो अशा कितीतरी समजुती, कल्पना पसरवील्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमे पुढे काही अडचणी निर्माण होतात की काय अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली असताना पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल थोरात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी या टीमने आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मनातील चुकीची आणि भ्रामक संकल्पनाना खोटे ठरवीत त्यांच्या मनात एक विश्वासदर्शक वातावरण निर्माण करण्यात यश मिळविले होते.

हे सुद्धा वाचा

कोरोना काळात कोरोनाला दूर करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सागर पाटील आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनकर गावित ह्यांनी स्वतःला कोविशील्ड लस टोचून घेत आपल्या सहकाऱ्यामध्ये विश्वास निर्माण करण्यात यश मिळविल्यानंतर अनेक जण लसीकरणासाठी पुढे आले होते. त्यामुळे जिल्ह्यात उभारलेल्या चार लसीकरण
केंद्रातून प्रत्येकी १०० अशा ४०० कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यापैकी पालघर ग्रामीण रुग्णालयात ७०, उपजिल्हा रुग्णालय जव्हार ६१ उपजिल्हा रुग्णालय डहाणू ६४ , वसई-विरार महानगरपालिके अंतर्गत वरूण इंडस्ट्रीज केंद्रात ६२ अशा चार केंद्रावर एकूण ३१९ कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले होते. राज्यातील ३६ जिल्ह्यांतून हा उच्चांक ठरला असून पालघर जिल्हा प्रथम ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRastra
Top