Saturday, 28 Nov, 4.44 pm नवराष्ट्र

होम
काय म्हणायचं आता | भारतातूनच करोना विषाणू जगभरात पसरला; चीनचा संतापजनक दावा

बीजींग : कोरोनाचा फैलाव कसा झाला हे साऱ्या जगालाच माहीत आहे. असे असताना चीनने एक संतापजनक दावा केला आहे. भारतातूनच करोना विषाणू जगभरात पसरला असल्याचा दावा चीनने केला आहे. याआधी अन्य देशांवरही चीनने अशा प्रकारचा आरोप केला होता. यानंतर आता चीन भारताबद्दल अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. वुहानमध्ये करोनाचा प्रादुर्भाव पसरण्यापूर्वी इटलीसोबतच जगाच्या इतर भागात करोना विषाणू पसरला असल्याचा दावा चीननं केला होता. मात्र, आता सर्वप्रथम भारतातूच करोना विषाणू पसरला असल्याचा दावा चीनच्या वैज्ञानिकांनी केला. हा दावा काही तज्ज्ञांनी खोडून काढला आहे.

'चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'च्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं भारतावर हा आरोप केला आहे. २०१९ च्या उन्हाळ्याच्या कालावधीत भारतात कोरोना विषाणू निर्माण झाल्याचे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. प्राण्यांपासून तयार झालेल्या या विषाणूने दुषित पाण्याच्या माध्यमातून मानवात प्रवेश केला. यानंतर हा विषाणू वुहानमध्ये पोहोचल्यानंतर करोना विषाणूची पहिल्यांदा ओळख पटवण्यात आली. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी चीनच्या टीमनं फिलोजेनेटिक विश्लेषणाचाही आधार घेतला आहे.

हा विषाणू बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक रिपब्लिक, रशिया अथवा सर्बियामध्ये तयार झाला असून वुहानमध्ये सापडलेला करोना विषाणू खरा नसल्याचा दावाही या चीनी वैज्ञानिकांनी केला. जुलै किंवा ऑगस्ट २०१९ मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा प्रसार झाल्याचाही दावाही त्यांनी केलाय.

अधिक उष्णतेमुळे प्राण्यामधुन या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केल्याचा निष्कर्षही चीनने काढला आहे. भारतातील आरोग्य व्यवस्थेला हा विषाणू ओळखता न आल्याने जगभरात याचा फैलाव झाल्याचा दावाही चिनी वैज्ञानिकांनी केला आहे.

चीनचा हा दावा खोडून काढत चीनचा हा दावा दोषयुक्त असल्याचं ब्रिटनमधील ग्लासगो विद्यापीठातील तज्ज्ञ डेव्हिड रॉबर्ट्सन यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRastra
Top