Wednesday, 13 Jan, 10.18 pm नवराष्ट्र

होम
Migrant Children | आठ ते दहा लाख स्थलांतरीत मुले शिक्षणापासून वंचित! ; मास्क, सँनिटायझरच्या वापरापासूनही दूर

शाळा बंद असल्यामुळे यावर्षी कामगारांची मुलेही आई-वडिलांसोबत साखर कारखाना, वीटभट्टी दगडखाणी व इतर बागायती पट्ट्यात कामासाठी गेली आहेत. तसेच यापैकी बहुसंख्य पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने यांचे ऑनलाईन शिक्षण होऊ शकलेले नाही.

  • मुलांचा सर्व्हे करून शिक्षण देण्याची केली मागणी
  • स्वयंसेवी संस्थांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई: ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर, दगडखाण आणि बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या स्थलांतरीत मजुरांच्या मुलांचे शिक्षण गेल्या दहा महिन्यापासून बंद आहे. राज्यात सुमारे ८ ते १० लाख स्थलांतरीत मजुरांची मुले कोरोना महामारीत शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. या मुलांचा सर्वे करून त्यांना शिक्षण देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवाळीनंतर ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर व आदिवासी भागातील हजारो मजूर बागायती पट्ट्यात काम करण्यासाठी गाव सोडून इतरत्र स्थलांतर करतात. दगडखाणीवर काम करणारी संख्याही मोठी आहे. शाळा बंद असल्यामुळे यावर्षी कामगारांची मुलेही आई-वडिलांसोबत साखर कारखाना, वीटभट्टी दगडखाणी व इतर बागायती पट्ट्यात कामासाठी गेली आहेत. तसेच यापैकी बहुसंख्य पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने यांचे ऑनलाईन शिक्षण होऊ शकलेले नाही.

हे सुद्धा वाचा

या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सर्व्हेक्षण करावे तसेच हे विद्यार्थी सध्या ज्या भागात आहेत. तेथील शिक्षकांनी त्यांचे ऑफलाईन शिकवावे, अशी मागणी सर्वहारा जनआंदोलन, रायगड, नंदुरबार येथाल लोकसंघर्ष मोर्चा, संघर्षवाहिनी, नागपूर, कोल्हापूर येथील अवनी, बीड येथील शांतीवन, समर्थन, मुंबई आणि नगर येथील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

मास्क, सँनिटायझरच्या वापरापासूनही दूर

शाळा बंद असल्याने बरीच मुले मास्क आणि सँनिटायझरच्या वापरापासूनही दूर आहेत. शाळेत आल्यावर या मुलांना ठराविक अंतरावर बसवून मास्क वापरायला लावणे, त्यांना सॅनिटायझर, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRastra
Top