Saturday, 23 Jan, 8.30 pm नवराष्ट्र

पुणे
पुणे | शिक्रापूरात ३१२ शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण; लसीमुळे कोणत्याही व्यक्तीस कुठलाच त्रास नाही - वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशिद

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीस लस दिल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखी खाली विश्रांती दिली जात असून त्या व्यक्तीला काही त्रास होतो का याची पाहणी केली जात आहे, तर या पाहणी दरम्यान लस दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला अद्याप पर्यंत काही त्रास झालेला नाही.

शिक्रापूर: शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात नुकतेच कोविड लसीकरण सुरु करण्यात आल्यानंतर ३१२ शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशीद यांनी दिली आहे. शिक्रापूर ता. शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात १६ जानेवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लक्ष देण्यास सुरुवात झाली असून शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, खासगी डॉक्टर तसेच त्यांचे हॉस्पिटल कर्मचारी अशा ३१२ लोकांना अद्याप पर्यंत सदर लस देण्यात आली असून उर्वरित इच्छुक कर्मचाऱ्यांना देखील ही लस देण्यात येणार आहे. शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीस लस दिल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखी खाली विश्रांती दिली जात असून त्या व्यक्तीला काही त्रास होतो का याची पाहणी केली जात आहे, तर या पाहणी दरम्यान लस दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला अद्याप पर्यंत काही त्रास झालेला नाही. सर्वसाधारण टिटीचे इंजेक्शन घेतल्यानंतर ज्या पद्धतीने इंजेक्शन घेतलेली जागा दुखते किंवा किंचितसा ताप येतो अशी काहीमध्ये लक्षणे दिसली तर अन्य कोणत्याही प्रकारचा त्रास कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्रास झालेला नसून कोणाच्याही तक्रारी आलेल्या नाहीत असे यावेळी बोलताना डॉ. वैजिनाथ काशीद यांनी सांगितले व उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ही लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शासनाने प्रथम आरोग्य सेवकांना लस दिल्याचे समाधान - डॉ. शरद लांडगे
कोरोना काळामध्ये अतिशय धोक्यामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केलेली असून शासनाने देखील डॉक्टरांची दखल घेतली असल्याने आमच्या कामाचे समाधान मिळाले आहे, तर सदर लस सुरक्षित असून सर्वांनी लस घेणे गरजेचे असल्याचे खासगी डॉक्टर डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRastra
Top