Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Breakfast Recipe : सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; ५ मिनिटांत तयार करा ही पौष्टिक स्मूदी

Breakfast Recipe : सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; ५ मिनिटांत तयार करा ही पौष्टिक स्मूदी

काळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. मात्र धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण नाश्ता टाळतात किंवा घाईघाईत काहीतरी खात घराबाहेर पडतात. याचा परिणाम शरीरातील ऊर्जा, एकाग्रता आणि पचनक्रियेवर होऊ शकतो.

अशा वेळी कमी वेळात तयार होणारा आणि पोटभर पोषण देणारा पर्याय म्हणजे स्मूदी. केळं, ओट्स आणि दूध या तीन सहज उपलब्ध पदार्थांपासून बनणारी ही स्मूदी चवीला स्वादिष्ट तर असतेच, शिवाय शरीराला आवश्यक पोषणही देते. विशेष म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पर्याय आवडू शकतो.

Health Tips : सकाळी उपाशीपोटी भिजवलेलं अंजीर खा; थकवा, कमजोरी आणि पचनाच्या तक्रारींपासून मिळेल आराम

साहित्य

  • १ पिकलेलं केळं

  • १ कप दूध

  • ३ ते ४ चमचे ओट्स

  • १ चमचा मध

  • थोडासा सुका मेवा

  • चिमूटभर दालचिनी पावडर

  • काही बर्फाचे तुकडे (ऐच्छिक)

कृती

सर्वप्रथम ओट्स काही मिनिटांसाठी दुधात भिजवून ठेवा. यामुळे ते मऊ होतात आणि स्मूदी अधिक क्रीमी बनते.

यानंतर मिक्सरच्या भांड्यात केळं, भिजवलेले ओट्स, दूध, मध आणि सुका मेवा घालून गुळगुळीत मिश्रण तयार करून घ्या.

थंडगार चव हवी असल्यास त्यात काही बर्फाचे तुकडे घालू शकता.

तयार स्मूदी ग्लासमध्ये काढून त्यावर दालचिनी पावडर भुरभुरवा आणि लगेच सर्व्ह करा.

पचन सुधारेल आणि प्रतिकारशक्ती वाढेल; रोज १ चमचा पांढरे तीळ-गूळ खाण्याचे 'हे' आहेत फायदे

स्मूदीचे फायदे

  • झटपट ऊर्जा मिळण्यास मदत - केळ्यातील नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला पटकन ऊर्जा देण्यास मदत करतात.

  • दीर्घकाळ पोट भरल्याची भावना - ओट्समधील फायबरमुळे भूक उशिरा लागते आणि मधल्या वेळेतील अनावश्यक खाणं कमी होऊ शकतं.

  • मुलांसाठी पौष्टिक पर्याय - दूध, ड्रायफ्रूट्स आणि ओट्समुळे ही स्मूदी प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत ठरू शकते.

  • व्यस्त जीवनशैलीसाठी योग्य - अवघ्या काही मिनिटांत तयार होत असल्याने ऑफिस, कॉलेज किंवा शाळेसाठी घाई असताना हा उत्तम नाश्ता ठरू शकतो.

लक्षात ठेवा...

स्मूदी अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी साखरेऐवजी मध किंवा खजूर वापरण्याचा पर्याय निवडू शकता. तसेच आपल्या आवडीनुसार त्यात सफरचंद, बेरीज किंवा सुकामेव्याचाही समावेश करता येतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti