Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; NEET प्रश्नी 'झुरळां'चा पहिला हल्ला

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; NEET प्रश्नी 'झुरळां'चा पहिला हल्ला

वी दिल्ली : भारतातील अधिकृत एक्स हँडल बंद केल्यानंतर, 'कॉकरोच जनता पार्टी' ने "कॉकरोचेस नेव्हर डाय" (झुरळे कधीच मरत नाहीत) या घोषवाक्यासह जोरदार पुनरागमन केले आहे.

शुक्रवारी या प्लॅटफॉर्मने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी नवीन मोहीम सुरू केली.

'कॉकरोच इज बॅक' या नवीन एक्स हँडल आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात असून, यात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील कथित अपयश आणि विशेषतः 'नीट-यूजी २०२६' परीक्षा पेपरफुटीच्या वादावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या समर्थकांना शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. एका व्हिडिओ संदेशात दिपके म्हणाले, " इंटरनेटवर तुम्ही खूप चांगले काम करत आहात असे सर्वजण म्हणतात, पण आता खऱ्या कामाची वेळ आली आहे. आज आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका सुरू करत आहोत."

नीट परिक्षेतील घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करून ते पुढे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेतील अपयशामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आणि नीट परीक्षेतील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. काहीही झाले तरी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल," असा दावा त्यांनी केला.

कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियात धुमाकूळ

दरम्यान, या मोहिमेदरम्यान आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे. एक्स हँडल बंद केल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ही बाब सरकारवरच उलटणार आहे (सेल्फगोल). याबाबत कायदेशीर कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेदरम्यान आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे. एक्स हँडल बंद केल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ही बाब सरकारवरच उलटणार आहे (सेल्फगोल). याबाबत कायदेशीर कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्थापितांचा पाठिंबा

तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांनी आपण या झुरळ जनता पक्षात 'सामील होऊ इच्छित' असल्याचे सांगून आवश्यक पात्रता" काय आहेत, अशी विचारणा केली होती. दुसरीकडे, याच पक्षाच्या महुआ मोईत्रा यांनी 'सीजेपी'ची एक पोस्ट रिपोस्ट करत म्हटले की, त्यादेखील या पक्षात सामील होऊ इच्छितात, "तसेच त्या या तथाकथित अँटी-नॅशनल पार्टी'च्या कार्ड-होल्डर सदस्य आहेत."

महुआ मोईत्रा यांचे स्वागत करताना 'सीजेपी'च्या एक्स (X) हँडलने म्हटले, "तुम्ही लोकशाहीला हवी असलेली लढाऊ व्यक्ती आहात, महुआ मोईत्रा. सीजेपीमध्ये तुमचे स्वागत आहे." तसेच, बर्धमान-दुर्गापूरचे खासदार कीर्ती आझाद यांचे स्वागत करताना पक्षाने म्हटले, "१९८३ चा विश्वचषक जिंकणे ही एक पुरेशी पात्रता आहे." काँग्रेसचे शशी थरुर तसेच अखिलेश यादव इत्यादींनीही या नव्या सोशल मिडिया मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

सोशल मीडियातले वादळ

दिपके यांच्या मते, सीजेपीचे मूळ हँडल बंद होण्यापूर्वी त्याचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. नवीन 'कॉकरोच इज बॅक' हँडलने अवघ्या २४ तासांत १.६५ लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर या प्लॅटफॉर्मने २.०५ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. हे आकडे सत्ताधारी भाजप (९.१ दशलक्ष) आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस (१३.४ दशलक्ष) यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti