Dailyhunt
एक्झिट पोल्सचे अंदाज ठरले खरे

एक्झिट पोल्सचे अंदाज ठरले खरे

वी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांबाबत बहुतांश एक्झिट पोल्सचे (निकालापूर्वीचे अंदाज) अंदाज खरे ठरले आहेत. मात्र, यामध्ये 'अॅक्सिस माय इंडिया' ही संस्था आघाडीवर राहिली आहे, कारण त्यांनी तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाच्या खळबळजनक कामगिरीचा अचूक अंदाज वर्तवला होता.

पश्चिम बंगालमध्ये बहुतांश एक्झिट पोल्सनी निकालाची दिशा अचूक ओळखली होती, पण 'टुडेज चाणक्य' आणि 'प्रजा पोल' यांनी भाजपच्या विजयाची व्याप्ती अचूक वर्तवली. प्रजा पोलने भाजपला १७८- २०८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. टुडेज चाणक्यः भाजपला १९२ आणि तृणमूल काँग्रेसला (TMC) १०० जागा मिळतील, असे भाकीत केले होते.

मतमोजणीच्या कलानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर निर्णायक विजय मिळवला असून, ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात आणली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti