Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजाला आग; एका खलाशाचा मृत्यू

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजाला आग; एका खलाशाचा मृत्यू

वी दिल्ली : ओमान आणि पर्शियन आखाताला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'जवळ एका भारतीय लाकडी जहाजाला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर भाजले आहेत.

१७ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी शनिवारी दिली.

घटना काय

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूनीवर आता होर्मुझ सामुद्रधुनीत एक मोठी समुद्री दुर्घटना घडली. ताज्या माहितीनुसार, गोळीबाराच्या तडाख्यात सापडल्याने एका भारतीय मालवाहू जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या जहाजावरील इतर १७ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. हे जहाज दुबईहून येमेनकडे जात असताना क्रॉस फायरिंगमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातच्या नाविकाचा मृत्यू

या घटनेतील मृत नाविकाची ओळख अल्ताफ तलब कर अशी झाली आहे. तो गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील जाम सलाया येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आळी आहे. १८ कर्मचाऱ्यांसह 'अल फैज नूर सुलेमानी' हे मालवाहू जहाज होर्मुज सामुद्रधुनीतून जात असताना अचानक गोळीबार सुरू झाला. हल्ल्याच्या वेळी अल्ताफ केर हे जहाजाच्या इंजिन रूमजवळ उपस्थित होते. गोळीबारात जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि ते हळूहळू बुडाले अशी माहिती समोर आली आहे.

१७ जणांना दुसऱ्या जहाजाने वाचवले

भारतीय नौकानयन जहाज संघटनाचे महासचिव आदम भाया यांनी सांगितले की, या घटनेनंतर जवळून जात असलेल्या 'प्रेम सागर' या जहाजाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान जहाजावरील उर्वरित १७ कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सर्वांना शुक्रवारी संध्याकाळी दुबई येथे पोहोचवण्यात आले. या जहाजावरील सर्व कर्मचारी हे भारतीय नागरिक होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti