Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जळगावमध्ये ३० लाख ३७ हजार मतदार; प्रारुप मतदार याद्या जाहीर

जळगावमध्ये ३० लाख ३७ हजार मतदार; प्रारुप मतदार याद्या जाहीर

ळगाव : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज ३१ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्ध केली. यावेही उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक अधिकारी अर्चना मोरे या उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याची प्रारूप मतदार यादीनुसार मतदार संख्या ३० लाख ३७ हजार ४५६ आहे. यात पुरुष संख्या १५ लाख ६७ हजार ३७५ असून महिला मतदार १४ लाख ६९ हजार ९९७ तर तृतीयपंथी ८४ मतदार आहेत. ज्या मतदारांनी गणनापत्रक बीएलओकडे जमा केलेले नाहीत, अशा ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यात ९३७०९ हे मयत मतदार असून २ लाख ६२ हजार ५४५मतदार हे कायमसवरूपी स्थलांतरित झाले आहेत. दुबार नोंदणी झाालेले ६१ हजार ३४ असून ९५८०८ मतदार गणनापत्रकावेळी गैरहजर होते.

जिल्हयात सर्वात जास्त मतदार हे चाळीसगावमध्ये असून त्यांची संख्या ३ लाख २० हजार ८७२ आहे. पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर जामनेर मतदारसंघात २ लाख ९६ हजार ६२६ मतदार आहेत तर पाचोरा मतदार संघात २ लाख ९० हजार १५२ मतदार आहेत. सर्वात कमी मतदार भुसावळ मतदारसंघात २ लाख ३४ हजार ३९१ मतदार आहेत. मतदारांपाठोपाठ मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात येत असून पूर्वी ३६७७ मतदार केंद्रे होती आता ३७०२ मतदारकेंद्रे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हाधिकारी घुगे यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti