Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'झुरळां'च्या 'एक्स' खात्यावरील बंदी कायम

'झुरळां'च्या 'एक्स' खात्यावरील बंदी कायम

दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स'वरील खाते बंद करण्याला अंतिरम स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेनं दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकार आणि एक्सला (पूर्वीचे ट्विटर) नोटीस बजावली आहे.

या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

'कॉकरोच जनता पार्टी'ची प्रचंड क्रेझ; पण अभिजीत दिपके याच्या पालकांना अटकेची धास्ती

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणाचे दूरगामी परिणाम आणि दूरगामी प्रभाव असल्याने, सरकारची बाजू ऐकल्याशिवाय असा आदेश दिला जाऊ शकत नाही. न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी ६ जुलै रोजी निश्चित केली. सरन्यायाधीश सूर्यकांत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केल्याचे प्रसिध्द झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. या कथित टिप्पणीनंतर कॉकरोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उदयास आले. शुक्रवार दुपारी ३ वाजेपर्यंत सीजेपीचे इन्स्टाग्रामवर सव्वादोन कोटी फॉलोअर्स होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti