Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केस फ्रिझी आणि निस्तेज झालेत? किचनमधील 'या' पदार्थांपासून तयार करा होममेड हेअर मास्क

केस फ्रिझी आणि निस्तेज झालेत? किचनमधील 'या' पदार्थांपासून तयार करा होममेड हेअर मास्क

केस धुतल्यानंतरही ते कोरडे, विस्कटलेले आणि फ्रिझी दिसत असतील तर हेअरस्टाइल करणेही कठीण जाते. अशावेळी केसांना मऊपणा आणि मॉइश्चर मिळण्यासाठी महागड्या प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून हेअर मास्क तयार करता येतो.

नारळाचे दूध, एलोवेरा जेल आणि एरंडेल तेल यांसारख्या पदार्थांपासून तयार केलेले हे मिश्रण केस अधिक मऊ आणि गुळगुळीत दिसण्यास मदत करू शकते.

हेअर मास्कसाठी लागणारे साहित्य

  • ताजे नारळाचे दूध - एक कप

  • लिंबाचा रस - दोन टेबलस्पून

  • एलोवेरा जेल - दोन टेबलस्पून

  • एरंडेल तेल - एक टेबलस्पून

  • कॉर्नफ्लॉवर - एक टेबलस्पून

Hair Care : केस गळत असतील तर रोज नवा उपाय नको; आधी 'या' चुका थांबवाचेहरा डल दिसतोय? कच्च्या दुधाने करा मिल्क फेशियल; फक्त ४ स्टेप्समध्ये घरच्या घरीच मिळवा फ्रेश लूक

मास्क तयार करण्याची सोपी पद्धत

एका भांड्यात नारळाचे दूध, एलोवेरा जेल आणि एरंडेल तेल एकत्र करा. दुसऱ्या वाटीत कॉर्नफ्लॉवर आणि लिंबाचा रस मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट नारळाच्या दुधाच्या मिश्रणात घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.

आता हे मिश्रण मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे सतत ढवळत गरम करा. मिश्रण थोडे घट्ट होऊन क्रीमसारखे दिसू लागले की गॅस बंद करा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या.

केसांना कसा लावायचा

मास्क लावण्यापूर्वी केसांचे छोटे भाग करून गुंता सोडवा. त्यानंतर हे मिश्रण केसांच्या लांबीवर मुळांपासून टोकांपर्यंत लावा. केसांना हलक्या हाताने खालील दिशेने सेट करा आणि शॉवर कॅप घालून साधारण तासभर हा मास्क राहू द्या.

त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. केस किंचित ओले असताना कंगव्याने खालील दिशेने हळूहळू विंचरून घ्या. केस सुकवताना शक्यतो नैसर्गिक पद्धतीचा वापर करा.

'या' पदार्थांचा केसांना कसा फायदा होऊ शकतो?

नारळाचे दूध केसांना मॉइश्चर देण्यास मदत करू शकते. त्यामुळे कोरडे केस अधिक मऊ आणि गुळगुळीत दिसू शकतात.

एलोवेरा जेल केसांमधील कोरडेपणा आणि फ्रिझ कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे केस अधिक स्मूद दिसण्यास मदत होते.

एरंडेल तेल केसांवर हलके कोटिंग देऊन त्यांना मऊ आणि चमकदार दिसण्यास मदत करू शकते.

कॉर्नफ्लॉवर मिश्रणाला घट्टपणा देते, त्यामुळे ते केसांवर क्रीमप्रमाणे लावणे सोपे जाते.

रबरबँडला विसरा! केस बांधताना स्क्रंची का ठरते फायदेशीर? जाणून घ्या

लिंबाचा रस केसांवरील अतिरिक्त तेलकटपणा आणि जमा झालेली घाण कमी करण्यास मदत करू शकतो.

हा घरगुती मास्क केसांना कायमस्वरूपी स्ट्रेट करण्याचा उपाय नाही. मात्र केसांना मॉइश्चर मिळाल्याने ते अधिक मऊ, गुळगुळीत आणि व्यवस्थित दिसू शकतात. कोणताही नवीन पदार्थ केसांना किंवा टाळूला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल. जळजळ किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti