Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MPSC पेपर फुटीप्रकरणी अनेक जणांना समन्स; गुन्हे शाखेकडून वेग

MPSC पेपर फुटीप्रकरणी अनेक जणांना समन्स; गुन्हे शाखेकडून वेग

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'औषध निरीक्षक' परीक्षेच्या कथित पेपर फुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तपासाला वेग दिला असून चौकशीसाठी अनेक जणांना समन्स बजावले आहे. गुन्हे शाखेची पथके सध्या या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या मुख्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यासाठी नंदुरबारमध्ये दाखल झाली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव उर्फ लोकेश पाटील याने सुरुवातीला परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा केला होता आणि नंतर आपली तक्रार मागे घेतली होती. त्याला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र, तो सध्या गायब असून तपास अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता लागलेला नाही.

तपासादरम्यान कोचिंग क्लासचालक प्रवीण पाटील आणि परीक्षा उत्तीर्ण झालेली एक महिला उमेदवाराचाही पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेने या तिन्ही व्यक्तींना समन्स बजावले होते, परंतु त्यांपैकी कोणीही आपापल्या घरी आढळून आले नाही.

सत्यता पडताळणी

कथित पेपर फुटीचे हे प्रकरण २२ मार्च रोजी झालेल्या 'एमपीएसस'च्या 'औषध निरीक्षक' परीक्षेशी संबंधित आहे. या परीक्षेच्या दोन दिवस आधी उत्तर पर्यायांसह ९० प्रश्न फुटल्याचा आरोप झाला होता. या दाव्यांमधील सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आपला तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti