Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai :  १० व्या मजल्यावरून पडूनही तरुणी बचावली; भांडुप पश्चिम येथील घटना, VIDEO

Mumbai : १० व्या मजल्यावरून पडूनही तरुणी बचावली; भांडुप पश्चिम येथील घटना, VIDEO

मुंबई : भांडुप पश्चिम येथील एका निवासी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या २६ वर्षीय तरुणीचा अग्निशमन दलाने थरारक बचाव केला. उडी मारल्यानंतर ती इमारतीलगतच्या झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

जखमी अवस्थेतील तरुणीला उपचारासाठी प्रथम अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भांडुप पश्चिम तुळशेतपाडा परिसरातील लेक रोडवर सनशाईन इमारत आहे. संबंधित तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली. मात्र खाली कोसळण्याऐवजी ती इमारतीलगत असलेल्या झाडाच्या फांद्यांमध्ये सुमारे २० ते २५ फूट उंचीवर अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने पहिल्या मजल्यावरून हुक लॅडरच्या सहाय्याने बचावकार्य राबवत तरुणीला सुरक्षित खाली उतरविले. त्यानंतर तिला खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti