Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : बीकेसी मेट्रो स्थानकात आढळला अतिविषारी घोणस

Mumbai : बीकेसी मेट्रो स्थानकात आढळला अतिविषारी घोणस

मुंबई : आरे ते कफ परेड या ॲॅक्वा लाइन भुयारी मेट्रो-३ मार्गिकेवरील वांद्रे-कुर्ला संकुल मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वार क्रमांक '५-अ'च्या बेसमेंटमध्ये मंगळवारी सकाळी विषारी असा दोन ते अडीच फूट लांबीचा घोणस आढळला.

हा अत्यंत विषारी साप असल्यामुळे प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली होती.

सर्पमित्रांनी घोणस सापाला पकडले असून सायंकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. बीकेसीतील मिठी नदीत, तसेच मिठी नदीलगतच्या परिसरात मोठ्या संख्येने सापांचा अधिवास आहे. बीकेसीत मागील काही वर्षांपासून साप आढळण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात.

गेल्या वर्षी मेट्रो-३ मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) बीकेसीतील कार्यालयात धामण आढळली होती. धामण विषारी नसली तरी काळजी घेणे गरजेचे आहे. अशात आता मंगळवारी सकाळी अत्यंत वर्दळीच्या बीकेसी मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वार '५-अ'च्या बेसमेंटमध्ये अतिविषारी घोणस आढळला.

मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बेसमेंटमध्ये साप असल्याची माहिती एमएमआरसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti