Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार; हायकोर्टाचा मुलाला दणका

Mumbai : ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार; हायकोर्टाचा मुलाला दणका

मुंबई : ८३ वर्षांच्या वृद्ध वडिलांना सतत शिवीगाळ, त्रास आणि मारहाण करणाऱ्या ५२ वर्षीय मुलाला उच्च न्यायालयाने दणका दिला. वृद्ध वडिलांच्या घरातून मुलाला बाहेर काढण्याचा 'मेंटेनन्स ट्रिब्यूनल'चा आदेश योग्य ठरवत न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकलपीठाने मुलाची याचिका फेटाळून लावली.

ज्येष्ठ नागरिकांना शांततेने आणि सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कलिना येथील वडिलांच्या घरातून बाहेर काढण्याच्या न्यायाधिकरणाच्या आदेशाला मुलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. मालमत्तेवरून भावंडांमध्ये वाद असू शकतात. परंतु मुलाने वडिलांवर हात उचलावा, हे खपवून घेता येणार नाही. वडिलांनी सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवाल पाहता, मुलाने मारहाण केल्याचे स्पष्ट होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti