Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा निष्कर्ष; ६ पैकी १ कोलोरेक्टल कॅन्सर रुग्णामध्ये आढळला लिंच सिंड्रोम

Mumbai : कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा निष्कर्ष; ६ पैकी १ कोलोरेक्टल कॅन्सर रुग्णामध्ये आढळला लिंच सिंड्रोम

मुंबई : मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आनुवंशिक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्हणजेच पोट आणि आतड्याच्या कॅन्सर म्युटेशनची तपासणी करण्यात आलेल्या दर सहापैकी सुमारे एका रुग्णामध्ये लिंच सिंड्रोम आढळला आहे.

जागतिक वैद्यकीय संशोधनानुसार, जगभरातील कोलोरेक्टल कॅन्सरच्या सुमारे ५ ते ८ टक्के प्रकरणांमध्ये लिंच सिंड्रोम जबाबदार मानला जातो.

लिंच सिंड्रोम ही एक अशी आनुवंशिक स्थिती आहे, ज्यामुळे कोलोरेक्टल म्हणजे आतड्याचा आणि एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

हॉस्पिटलच्या जेनेटिक रजिस्ट्रीच्या ४ वर्षांच्या नवीन आकडेवारीनुसार, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण १५.५ टक्के आढळले आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा सुमारे तीन पटीने जास्त आहे.

डॉक्टरांच्या मते, हा निष्कर्ष याकडे इशारा करतो की, भारतीय रुग्णांमध्ये आनुवंशिक कॅन्सरच्या या धोक्याकडे कमी लक्ष दिले जात आहे आणि त्याची पुरेशी तपासणी केली जात नाही.

हे निष्कर्ष हॉस्पिटलच्या हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिकमध्ये चार वर्षांच्या कालावधीत आनुवंशिक म्युटेशनची तपासणी करण्यात आलेल्या ७८० कॅन्सर रुग्णांच्या अभ्यासातून समोर आले आहेत. यापैकी २८४ रुग्णांची तपासणी पोट आणि आतड्याच्या कॅन्सरशी संबंधित म्युटेशनसाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये ४४ रुग्ण (१५.५ टक्के) पॉझिटिव्ह आढळले.

याशिवाय, ४९५ रुग्णांची तपासणी 'हेरेडिटरी ब्रेस्ट अँड ओव्हेरियन कॅन्सर' म्युटेशनसाठी करण्यात आली. यापैकी १०३ रुग्ण (सुमारे २१ टक्के) पॉझिटिव्ह आढळले. म्हणजेच दोन्ही समूहांमध्ये तपासणी करणाऱ्या दर पाचपैकी सुमारे एका रुग्णामध्ये आजार निर्माण करणारे आनुवंशिक म्युटेशन आढळले आहे.

लिंच सिंड्रोम दुर्लक्षित राहिलेले कारण

मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील मॉलिक्युलर पॅथॉलॉजीच्या कन्सलटंट डॉ. अमृत कौर कालेर म्हणाल्या, "भारतीय रुग्णांमध्ये आनुवंशिक कॅन्सरची जेवढी प्रकरणे समोर येत आहेत, त्यामध्ये लिंच सिंड्रोम हे सर्वात मोठे आणि सर्वात जास्त दुर्लक्षित राहिलेले कारण आहे. आमची आकडेवारी सांगते की, पोट आणि आतड्याच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या दर सहापैकी सुमारे एका रुग्णामध्ये हे म्युटेशन आढळले आहे. हे प्रमाण जागतिक पातळीवर नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांपेक्षा जवळपास तीन पटीने जास्त आहे."

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti