Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : पावसाळ्याचे पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या, आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचे निर्देश

Mumbai : पावसाळ्याचे पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या, आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचे निर्देश

मुंबई: मलेरिया डेंग्यू, लेप्टो यांसारखे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पसरतात. साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी दिले आहेत.

पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर, आरोग्य विभागाचे उपायुक्त, सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधिष्ठात्री आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात उदभवणाऱ्या साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो, रुग्णसंख्या, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार, रुग्णालयांमधील औषधसाठ्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. 'डायबिटीस मुक्त हेपिटायटीस (ए आणि इ) अशा आजारांची सध्या मुंबईत असलेली मुंबई' अभियानाची सद्यस्थिती, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मॅमोग्राफी चाचणी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तसेच महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय

महिलांमधील वाढत्या ब्रेस्ट कॅन्सरच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती प्रभावीपणे कशी करता येईल, महिलांमध्ये नियमित तपासणीचे महत्त्व कसे पोहोचवता येईल, तसेच प्राथमिक टप्प्यात आजाराचे निदान होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

चिमुकल्यांना मोफत श्रवणयंत्र

१ ते ३ वर्षे वयोगटातील ऐकण्याची किंवा बोलण्याची समस्या असलेल्या चिमुकल्यांना मोफत श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाबाबतही सविस्तर चर्चा झाली. अशा बालकांचे वेळेत निदान व उपचार होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. मुंबईकरांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संबंधित अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांसमवेत विविध विषयांचा सखोल आढावा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti