Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द; 'एमआयएम'ला धक्का

Mumbai : शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द; 'एमआयएम'ला धक्का

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच खाते उघडणाऱ्या एमआयएम पक्षाला चार महिन्यांतच जोरदार धक्का बसला आहे. गोवंडी प्रभाग क्रमांक १३७ मधून निवडून आलेले शमीर पटेल यांचे जात प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.

त्यानंतर सोमवारी शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली. दरम्यान, एमआयएमची नगरसेवकांची संख्या ८ वरून ७ इतकी झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवार उतरवले होते. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडली. यात एमआयएम पक्षाचे पहिल्यांदाच ८ नगरसेवक निवडून आले. त्यावेळी जात प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्रे सादर करणे विजयी नगरसेवकांना बंधनकारक असते. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक लढवून विजयी झालेल्या शमीर पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार आयशा रफिक शेख या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti