Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai : टॅक्सी, रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत; १ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सींचे भाडे वाढणार

Mumbai : टॅक्सी, रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत; १ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सींचे भाडे वाढणार

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना १ सप्टेंबरपासून लागू होणारे सुधारित भाडे दर्शवण्यासाठी आपले इलेक्ट्रॉनिक मीटर फेरप्रमाणित (रिकॅलिब्रेट) करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरच्या मुदतीत मीटर अपडेट न करणाऱ्या चालकांवर १ डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये कमाल ५ हजार रुपयांच्या मर्यादेत दररोज ५० रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) ऑटोरिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सी चालकांना नवीन भाडेरचनेनुसार मीटर फेरप्रमाणित करण्याचे निर्देश दिले आहेत. फेरप्रमाणीकरण पूर्ण होईपर्यंत चालकांना सुधारित भाडे तक्त्यानुसार प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार मीटर टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये, तर ऑटोरिक्षाचे किमान भाडे २६ रुपयावरून २७ रुपये होणार आहे. प्रवाशांसाठी टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची आणि ऑटोरिक्षाच्या भाड्यात १ रुपयाची वाढ झाली असून, वाद टाळण्यासाठी हे मीटर अपडेट केले जात आहेत.

अपॉइंटमेंट मिळण्यास विलंब होणार

मीटर चाचणी आणि फेरप्रमाणीकरणासाठी उपलब्ध केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने प्रशासन आणि चालकांसमोर हे आव्हान ठरू शकते. मुंबई महानगर प्रदेशामध्ये (एमएमआर) सध्या सुमारे ४ लाख १७ हजार नोंदणीकृत ऑटोरिक्षा आणि ४४ हजार ८२५ काळी-पिवळी टॅक्सी आहेत. मात्र या प्रक्रियेसाठी केवळ १५ ते २० केंद्रेच उपलब्ध आहेत. सर्व वाहनांना तीन महिन्यांत हे काम पूर्ण करायचे असल्याने अधिकृत केंद्रांवर चालकांना अपॉइंटमेंट मिळण्यास विलंब होऊ शकतो.

अशी मिळेल परवानगी

या प्रक्रियेअंतर्गत अधिकृत डीलर प्रथम मीटरवरील जुने सील काढून नवीन भाडेरचना असलेली चिप बसवतो. त्यानंतर डीलरकडून लेव्हल १ चाचणी घेऊन प्रमाणपत्र दिले जाते. यानंतर 'आरटीओ' अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची १.५ किमी रस्त्यावर प्रत्यक्ष चाचणी घेतली जाते. मीटरने विहित मानके पूर्ण केल्यावरच वाहनाला सुधारित भाडे आकारण्याची परवानगी दिली जाते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti