Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Navi Mumbai : रबाळ्यात विवाहितेची आत्महत्या

Navi Mumbai : रबाळ्यात विवाहितेची आत्महत्या

वी मुंबई : पोलीस पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळवणुकीला कंटाळून त्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रबाळे येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात सदर पोलिसाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील मृत विवाहितेचे नाव अनिता डोळस असे असून ती रबाळे गावात गणेश कृपा अपार्टमेंटमध्ये पती अरुण मोहन डोळस व दोन मुलांसह राहत होती. अनिताने वकिलीचे शिक्षण घेतले होते. तसेच ती ठाणे येथील कोर्टात प्रॅक्टिस करत होती. अनिताचा पती अरुण डोळस हा पोलीस आहे. अरुण याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून सन २०२३ पासून पती-पत्नीत वाद होत होते. या वादातून आरोपी अरुण हा पत्नी अनिता हिला सतत मानसिक त्रास देत होता.

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

अनिताला डॉक्टरांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिला त्रास होत होता. तरीही अरुण हा तिला सोडून गावी निघून गेला होता. त्यामुळे संतप्त अनिताने पती अरुण याला व्हिडीओ कॉल करून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शेजारीच राहणाऱ्या अनिताच्या आई वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तीन दिवसाच्या उपचारानंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti