Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
न्या. रवींद्र घुगे यांच्या पदोन्नतीची शिफारस

न्या. रवींद्र घुगे यांच्या पदोन्नतीची शिफारस

वी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून चार न्यायाधीशांच्या पदोन्नतीची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही.

घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याचेही या बैठकीत सुचवण्यात आले.

दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्या. अश्विनी कुमार मिश्रा यांची याच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti