Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फ्रान्स, बांगलादेशप्रमाणेच भारतातही कट रचला - किरेन रिजिजू

फ्रान्स, बांगलादेशप्रमाणेच भारतातही कट रचला - किरेन रिजिजू

नवी दिल्ली : फ्रान्स आणि बांगलादेशमध्ये यापूर्वी घडलेल्या हिंसक घटनांसारखेच कटकारस्थान भारतातही रचण्यात आले होते. तरुणांना भडकावून रस्त्यांवर हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न भारतविरोधी टोळ्या आणि काही राजकारण्यांनी केला, असा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी केला.

मात्र, असे 'धोकादायक कटकारस्थान' रचणारे भारत हा बांगलादेश किंवा फ्रान्स नाही, हे विसरले. असे सांगत रिजिजू यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. या महिन्यात दिल्लीमध्ये मतदार याद्यांच्या एसआयआर विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.

भारतात सत्तापरिवर्तन होणे निश्चितच शक्य आहे; मात्र ते केवळ निवडणुकांच्या माध्यमातूनच होऊ शकते, 'सोरोस'च्या माध्यमातून नाही, असे संसदीय कामकाजमंत्री रिजिजू यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti