Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन

पुणे : 'पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण उत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि हे फक्त पुणेकरच करू शकतात. त्यामुळे माझे पुणेकरांना आवाहन आहे की, डीजेमुक्त उत्सवाच्या वादात न पडता संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो, हे पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले पाहिजे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या समारोप प्रसंगी फडणवीस बोलत होते.

पुण्यामध्ये डीजेमुक्त गणेशोत्सवावरून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पुण्यातील नागरिक यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, 'मी ज्यावेळेस इथून बाहेर पडेन तेव्हा मीडिया मला पुण्याच्या संदर्भात एकच प्रश्न नक्की विचारणार आहे की, तुम्ही गणेशोत्सवाचे बोललात, मग गणेशोत्सवामध्ये डीजे वाजला पाहिजे की नाही? त्याचा उल्लेख करून फडणवीस यांनी कोणत्याही वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti