Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष

शुभ ग्रहांची साथसंगत

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. धारिष्ट्यवान, निश्चयी, उतावळा असा स्वभाव असतो तसेच तो संरक्षकही असतो. सर्वसाधारण धाडसी, कोणाचेही न ऐकणारा, हेकेखोर, हट्टी, स्वतंत्र वृत्तीचा, अति महत्त्वाकांक्षी असे गुण आढळतात.

मेष राशीतील सर्वात उत्तम गुण म्हणजे राष्ट्रहितासाठी कार्य करणारे असते. त्यासाठी त्यांचे तेज उत्तम असते. विकासासाठी कार्य करणारे, सर्व गुण, धैर्य, सहनशक्ती, शौर्याची कृत्ये करणारे असे असतात. दुसऱ्याचे दुःख निवारण करण्यासाठी आत्मयज्ञ, स्वार्थ, त्याग, आत्मविश्वास हे नैसर्गिक गुण मेष राशीच्या जातकांमध्ये आढळतात, पण त्यासाठी पत्रिकेमध्ये अथवा कुंडलीमध्ये चंद्र व मंगळ हे दोन्ही सुस्थितीत असावे लागतात.

शिक्षण : हा कालावधी आपणास सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल आहे. कला, क्रीडा क्षेत्रातही आपणास चांगले यश प्राप्त करता येईल. कालावधी अनुकूल आहे. संधी मिळतील. आपले कर्तृत्व सिद्ध करणे आपल्या हातात आहे. त्यामध्ये विशेष प्राविण्य सुद्धा मिळू शकते. स्पर्धापरीक्षेसाठी आपणास अनुकूलता मिळणार आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी आपली तयारी चांगली होणार आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची घाई करू नका. शांतपणे व योग्य विचार आपणास यश मिळवून देतील.

पारिवारिक : कुटुंबातील परिस्थिती, शांत असणार आहे. अनुकूलता व्यापलेली असेल, सकारात्मक घटना गतीत होतील. शुक्र भ्रमणाची साथ राहील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. त्याचप्रमाणे तरुण-तरुणींचे करिअरविषयी असलेले प्रश्न सुटतील. तरुणांचे भाग्योदय होतील. अपवादात्मक पार्श्वभूमीतून देणारे ग्रहमान राहील. शिस्तबद्ध रहा, कामाचे उत्तम नियोजन करा, फसवणुकीचे प्रसंग टाळा, सहकुटुंब प्रवासयोग उत्तम आहेत.

नोकरी, व्यवसाय, धंदा : ज्या जातकांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न बघितले असेल अशा जातकांचे स्वप्न या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास ते सफल होऊन स्वतःच्या वास्तूमध्ये प्रवेश करू शकाल. पैशाची सोय होईल, त्याचप्रमाणे राहत्या घराचे प्रश्न मिटतील. राहत्या घराच्या सुशोभीकरणासाठी व घरातील भौतिक सुखसुविधा वाढविण्यासाठी मुक्त हस्ते खर्च कराल. या कार्यामध्ये आपल्याला भावंडांची सुद्धा मदत होऊ शकते तसेच घरातील ज्येष्ठ मंडळी सुद्धा मदत करू शकतील. नोकरीमध्ये वातावरण अनुकूल राहील. काही वेळेस जास्तीचे काम सुद्धा पडू शकते. जास्त वेळ देणे गरजेचे ठरेल, त्याचप्रमाणे वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी आपल्या ज्ञानामध्ये आपण अद्यावत राहणे गरजेचे आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यापार, व्यवसाय, धंद्यामध्ये ठीकठाक परिस्थिती राहील. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. त्यासाठी खर्चसुद्धा कराल.

शुभ दिनांक : २,४,५,१९,२०,२१,२३,२४,२५,२८

अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०

वृषभ

असंगाशी संग नको

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. प्रेम, सौंदर्य, वैवाहिक सुख, आराम, विलासिता याचे द्योतक आहे. ही कुटुंब संबंधित व धनस्थानासंबंधीतील रास आहे. ही पृथ्वी तत्त्व अर्थ तत्त्वाची राशी आहे. शुक्र हा ग्रह स्त्री ग्रह असून रज गुणाचा आहे. हे गुण वृषभ राशीमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. शुक्रामध्ये आकर्षण शक्ती असल्याने या राशींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते. त्यांची वाणी देखील सुमधुर असते. शुक्र कोमल, मृदू व सुसंस्कृत आहे. पण हे गुण पत्रिकेमध्ये शुक्र व चंद्र बलवान असल्यासच दिसून येतात अन्यथा ते अनुकूल नसल्यास त्याच्याविरुद्ध त्यांचा स्वभाव असू शकतो.

शिक्षण : या महिन्यातील ग्रहमान शिक्षणासाठी अनुकूल ठरेल. आपल्या क्षमतेचा आपण पूर्णपणे वापर करू शकाल. आपण केलेल्या कष्टाचे व घेतलेल्या परिश्रमाचे अपेक्षित फळ प्राप्त होईल. सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. आपले केलेले प्रयत्न यशस्वी होतील. साहित्य क्षेत्रातील तसेच ललित, संगीत क्षेत्रातील जातकांना उत्तम फळे लाभतील तसेच विशेष यश मिळू शकेल. कलाकारांच्या हातून अविस्मरणीय कलाकृती निर्माण होऊ शकते. प्रसिद्धी व अर्थप्राप्ती होईल. स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. परदेशासंबंधी शिक्षणात चांगले यश प्राप्त होईल.

पारिवारिक : आपल्या परिवारात काही वेळेस विचित्र घटना घडू शकतात. परिवारातील सदस्यांमध्ये आपापसात मतभेद अथवा वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडू शकते. ते सांभाळा. वादविवाद टाळणे महत्त्वाचे राहील. शांत राहा. मातृ-पितृ चिंता निर्माण होऊ शकते. त्यांच्याकडे वेळेसच लक्ष द्या. विशेषतः परिवारातील स्त्री सदस्यांनी आपल्या बोलण्यावर, वागण्यावर नियंत्रण ठेवावे. त्यामुळे घरातील शांतता टिकण्यास मदत होईल. कोणतेही मन:स्वास्थ्य बिघडवणारे प्रसंग घडणार नाहीत.

नोकरी, व्यवसाय, धंदा : शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. व्यापार, व्यवसाय, धंद्यात प्रगती आणि उन्नती करू शकाल. कार्य व्याप्ती वाढेल. आपण सतत कार्यमग्न राहाल. व्यावसायिक जुनी वादग्रस्त येणे वसूल होतील. त्यामुळे आर्थिक नियोजन अधिक चांगल्यारीत्या करू शकाल. व्यवसाय, धंद्यात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी होण्यासाठी अधिक प्रयत्न कराल. व्यवसाय, धंद्यातील सरकारी कामे पूर्ण करू शकाल. जमीनजुमला, स्थायी मालमत्ता तसेच वडिलोपार्जित संपत्ती याविषयीचे असलेले वादविवाद संपुष्टात येतील. समाधानकारक मार्ग निघेल. नोकरीमध्ये मात्र वरिष्ठांबरोबर असलेले संबंध काही प्रमाणात ताणले जाऊ शकतात. त्यांच्याबरोबर संबंध सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. परिवारात वातावरण चांगले राहील. मुला-मुलींना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. हव्या त्या क्षेत्रात शिक्षण घेता येईल तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न सफल होतील.

शुभ दिनांक : ४,५,१२,१३,२१,२३,२४,२५

अशुभ दिनांक : १,३,९,१०,११,१५,३०

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti