Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शाळांची दयनीय स्थिती, महागाईविरोधात फ्रान्समध्ये हिंसाचार; १८०० जणांना अटक

शाळांची दयनीय स्थिती, महागाईविरोधात फ्रान्समध्ये हिंसाचार; १८०० जणांना अटक

पॅरिस : फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि शाळांच्या दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. या निदर्शनांदरम्यान काही हिंसक गटांनी पोलिसांशी संघर्ष केला आणि दुकानांची लूटमार केली.

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण फ्रान्समधून किमान १,८०० जणांना अटक केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी अनेक शहरांमध्ये तोंडावर मुखवटे घातलेल्या गटांनी सार्वजनिक इमारतींवर, (ज्यात महानगरपालिका कार्यालयांचाही समावेश आहे) हल्ले केले आणि त्यांना आग लावली.मध्य फ्रान्समधील लिमोज शहरात, १९ व्या शतकातील महानगरपालिका कार्यालयाला आग लागली. ज्यामुळे त्याचे छत कोसळले. या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमिवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी दुपारी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली.

५०० पोलीस अधिकारी जखमी

अधिकाऱ्यांच्या मते, संपूर्ण फ्रान्समध्ये सुमारे ५,५०,००० लोकांनी निदर्शनांत भाग घेतला होता, तर आयोजकांच्या मते ही संख्या सुमारे ८ लाख होती. या हिंसाचारात ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti