Dailyhunt
सिंधुदुर्गातील ५२ मंदिरांचा होणार कायापालट; ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर

सिंधुदुर्गातील ५२ मंदिरांचा होणार कायापालट; ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेतील क वर्ग यात्रा स्थळ विकास योजनेंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील ५२ मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या कायापालट होणार आहे आणि या मंदिरांचे रुपडे बदलणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांचा विकास आणि कायापालट करण्यासाठी दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे भक्तनिवास बांधणे, पिण्याच्या पाण्याची योजना यासारखी कामे केली जातात. त्यानुसार २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५२ मंदिरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामांसाठी हा निधी मंजूर केला असून या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात येत आहेत

तालुका निहाय कामांचा तपशील

कणकवली : गांगो मंदिर फोंडाघाट, (१५ लाख), गांगो- लिंग मंदिर, घोणसरी, (१५ लाख), गांगेश्वर मंदिर लोरे (१० लाख)

देवगड : आरेश्वर मंदिर, आरे (२० लाख), हेदुलाई मंदिर, खुडी (२५ लाख), पावणाई मंदिर, किंजवडे (१० लाख).

कुडाळ : भराडी मंदिर, वाडीवरवडे, (५ लाख), श्री स्वामी समर्थ मठ (६ लाख), सिद्ध महादेव मंदिर, केरवडे-नारुर (७ लाख), गिरोबा मंदिर, बिबवणे (३ लाख), सिमरा देवी मंदिर, रानबांबुळी (१५ लाख), श्रीकृष्ण मंदिर, सोनवडे (५ लाख), पावणाई मंदिर, मोरे, (५ लाख), देव कलेश्वर मंदिर, नेरूर (१० लाख), गिरोबा मंदिर, बिबवणे(५ लाख ), सातेरी मंदिर, अंजीवडे (५ लाख ), लक्ष्मीनारायण मंदिर, आवळेगाव(५ लाख), स्वयंभू मंदिर,पांग्रड(५ लाख), जटाशंकर मंदिर, केरवडे- नारूर(५ लाख), कलेश्वर मंदिर, नेरूर, (१५ लाख), गिरोबा मंदिर, भडगाव बुद्रुक(१ लाख ), रामेश्वर मंदिर, आकेरी, (५ लाख), लिंगेश्वर मंदिर, सोनवडे (५ लाख).

मालवण : मिर्लेश्वर -भगवती मंदिर, बुधवळे, (१४ लाख), लिंगेश्वर मंदिर, गुरामनगरी (६ लाख), भगवती मंदिर, देवली, (५ लाख), गिरोबा मंदिर, नांदरुख (५ लाख), गांगेश्वर मंदिर आडवली (५ लाख), रामेश्वर -पावणाई मंदिर,असगणी, (४ लाख), लिंगेश्वर मंदिर, श्रावण (४ लाख), गांगेश्वर मंदिर, राठीवडे, (१५ लाख)

सावंतवाडी : सातेरी -माऊली मंदिर, नेतर्डे (१५ लाख), पावणाई-रवळनाथ मंदीर पारपोली, (१० लाख) माऊली मंदिर, कवठणी, (७ लाख)भावई मंदिर, चौकुळ, (७ लाख), माऊली मंदिर, आंबोली, (१२ लाख)

वेंगुर्ला : घोडेमुख, पेंडूर (१० लाख), सिद्धेश्वर मंदिर, म्हापण, (१० लाख )

दोडामार्ग : सातेरी मंदिर, मणेरी (१५ लाख), हनुमान मंदिर, फुकेरी, (३१ लाख), माऊली मंदिर, मोरगाव, (७ लाख).

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti