Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Tamilnadu : निवृत्त महिला अधिकारी माकडांच्या सहचरी

Tamilnadu : निवृत्त महिला अधिकारी माकडांच्या सहचरी

दुराई : निवृत्तीनंतरचे आयुष्य अनेकजण स्वतःच्या छंदांत किंवा आरामात घालवतात, मात्र तमिळनाडूतील मदुराई येथील ७६ वर्षांच्या निवृत्त पोलीस अधिकारी मालथी यांनी समाजसेवेचा एक आगळावेगळा मार्ग निवडला आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून त्या आपल्या पेन्शनमधील मोठा हिस्सा खर्च करून तिरुपरनकुंड्रम परिसरातील शेकडो माकडांना पोटभर अन्न भरवत आहेत.

मालथी यांनी आपल्या कार्यकाळात गांधीग्राम विद्यापीठात शारीरिक शिक्षण संचालक आणि कोडाईकनाल येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ३३ वर्षे तमिळनाडू पोलीस दलात सेवा बजावली आणि २०१० मध्ये त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर २०१५ पासून त्यांनी माकडांना खाऊ घालण्याचे हे व्रत हाती घेतले.

तिरुपरनकुंड्रम मुरुगन मंदिर आणि आसपासच्या परिसरात माकडांची मोठी संख्या पाहून त्यांना मदतीची गरज असल्याचे मालथी यांच्या लक्षात आले. त्या आठवणी सांगताना म्हणाल्या, "ही माकडे डोंगराळ आणि जंगल भागात राहतात, त्यांना अन्नासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. २०१५ मध्ये हे पाहून मी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला." सुरुवातीला त्या दररोज जात असत, मात्र आता वयोमानामुळे आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्या दर शनिवारी न चुकता ही सेवा बजावतात. "या सेवेतून मिळते मानसिक समाधान" आपल्या या कार्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, या प्राण्यांची सेवा केल्याने मला प्रचंड आनंद आणि मानसिक समाधान मिळते.

३५० माकडे होतात जमा

मालथी तिरुपरनकुंड्रम परिसरातील सहा ठिकाणांना भेट देतात, ज्यामध्ये मंदिर परिसर, सरवण पोईगाई, पालचुनाईकंडा सुब्रमण्यम मंदिर, मयूर वन आणि किल्ला परिसराचा समावेश आहे. शनिवारी दुपारी ३:३० च्या सुमारास मालथी यांनी हाक मारताच ३५० ते ४०० माकडे तिथे जमा होतात. त्या सांगतात की, काही ठिकाणी एकाच वेळी ५० माकडे येतात, तर गुहा मंदिर आणि मयूर वन परिसरात त्यांची संख्या २०० पेक्षा जास्त असते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Navshakti